करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

तालुक्यात रोहिणीची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तालुक्यात रोहिणीची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला

केत्तूर (अभय माने) करमाळा तालुक्यातील केत्तूरसह पश्चिम भागातील टाकळी, जिंती, कात्रज, पोमलवाडी, हिंगणी, पारेवाडी, दिवेगव्हाण, राजुरी, वाशिंबे, गुलमोहरवाडी परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले होते. काही ठिकाणी शेतातून पाणी वाहिले तर काही ठिकाणी शेतीचे बांधही फुटले.

रोहिणी नक्षत्र संपता संपता परिसरात बुधवार (ता.5) रोजी पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतकरी राजा चांगला सुखावला आहे. जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केल्याने व सर्वदूर हजेरी लावल्याने खरीपाच्या पेरण्यांना वेग येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – “स्वच्छता मॉनिटरगिरी” करण्यात खातगाव नं.2 शाळा राज्यात सर्वोत्तम; मुंबईत होणार सत्कार, टॉप फिफ्टी मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव शाळा

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

या पावसामुळे ग्रामीण भागातील जलजीवांच्या कामामुळे रस्त्याची मार्ग मात्र पुरती वाट लागली आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य झाले होते.पाऊस वा वारे सुरू होताच वीज पुरवठा 8 ते 10 तास खंडित होत आहे.

litsbros