करमाळासांस्कृतिकसोलापूर जिल्हा

भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजनाने करमाळयात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भरगच्च कार्यक्रमांच्या आयोजनाने करमाळयात राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती संपन्न

करमाळा(प्रतिनिधी); राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाजाच्या वतीने करमाळा येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते.

त्यापैकी राजमाता भवन निलेज रोड या ठिकाणी पाणपोई व वृक्षारोपण करून राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मकाई सह.सा‌.का. मा.चेअरमन दिग्विजय भैया बागल, बाजार समितीचे मा. सभापती शिवाजीराव बंडगर,आदि.सह. सा. का.मा.संचालक धुळाभाऊ कोकरे, पं.समिती सदस्य ऍड.राहुल सावंत, मनसेचे तालुकाध्यक्ष संजय बापू घोलप,भारीपचे नेते शहाजी ठोसर,नगरसेवक अतुल भैय्या फंड, रिटेवाडीचे मा.सरपंच दादा कोकरे, सुहास ओहळ, अंजनडोहचे सरपंच अरुण शेळके, माजी सरपंच शहाजी माने,संतोष भांड यांच्या हस्ते वृक्षारोपण व पाणपोईचे उद्घाटन संपन्न झाले.यावेळी दिग्विजय बागल,राहुल सावंत, शिवाजी बंडगर यांनी राजमाता विषयी मनोगत व्यक्त केले.

यानंतर दूपारच्या सत्रात मदरशा उर्दू शाळेत अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत सन्मान धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, इंजि.आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर, रासप तालुका अध्यक्ष जिवन होगले, इंजि प्रविण होगले, इंजि.हर्षल कोळेकर,संपर्क प्रमुख विकास मेरगळ यांनी केले. जयंतीनिमित्त मदरशा उर्दू शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व पेनचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा नगरपरिषदेचे नगरसेवक प्रशांत ढाळे,पर्मनंट नगरसेवक संजय(पप्पू) सावंत, जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे,ऍड.जमीर शेख, कुगावचे नेते जैनुद्दीन शेख,सिकंदर मुलानी, मदरशा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक कारी काझी सहाब यांची प्रामुख्याने उपस्थितीत होती. आयोजित कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक प्रशांत ढाळे,कारी काझी साहेब, बाळासाहेब टकले यांनी मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर तिसऱ्या सत्रात राजमाता भवन निलज रोड या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दहावी बारावी व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन सकल धनगर समाज व राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुका वतीने करण्यात आले.

या आयोजित कार्यक्रम प्रसंगी करमाळा तहसीलचे नायब तहसिलदार बाबासाहेब गायकवाड, जगताप गटाचे नेते बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप,धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, रासप जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, भाजपा इंजि.आ.जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर, तालुका अध्यक्ष जिवन होगले, मातोश्री बहु.सं.चे अध्यक्ष प्रवीण होगले, पत्रकार सुनील भोसले, प्रा. श्रीकांत दरगुडे, राजमाता अभ्यासिकाचे संचालक डॉ.समाधान कोळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शाल,पुष्प, श्रीफळ, पेन देऊन सन्मानित करण्यात आले‌.

हेही वाचा – उमरड येथे राजमाता अहिल्याराणी होळकर यांना अभिवादन; दहावीतील गुणवंतांचा ही झाला सत्कार

आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

यावेळी यशस्वी विद्यार्थी पालक व राजमाता करिअर अकॅडमी मधील विद्यार्थीना पुढील शैक्षणिक व यशस्वी करीअर वाटचालीसाठी नायब तहसीलदार बाबासाहेब गायकवाड, शंभूराजे जगताप, प्रा. श्रीकांत दरगुडे, डी वाय पाटील चे संचालक गायकवाड सर, पत्रकार सुनील भोसले यांनी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता प्रदीप वाघमोडे, डॉ. समाधान कोळेकर, तात्या काळे,संतोष भांड, शंकर सुळ,अश्फाक शेख, ईलास घोणे, सुखदेव कोपनर, सोनबा गावडे, विठ्ठल भिसे, अविनाश कुराडे, तानसेन खांडेकर, दीपक कडू, सचिन सामसे,रघुवीर खटके,शरद घरबुडे, विठ्ठल खांडेकर इत्यादी सह राजमाता अभ्यासिका अकॅडमी मधील विद्यार्थी, पालक, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros