करमाळा राजकारण सोलापूर जिल्हा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास; जयंत पाटील म्हणाले..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास; जयंत पाटील म्हणाले..

करमाळा(प्रतिनिधी); राष्ट्रवादीसोबत काम करण्याच्या इराद्याने जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष विनिता बर्फे यांच्यासह संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार व त्यानंतर खा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली होती.

यावेळी सविस्तर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात जनशक्ती संघटनेचे अतुल खूपसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय ते विधान भवन मुंबई असा दोघांचा जयंत पाटील यांच्या गाडीतून चर्चा करत प्रवास झाला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘जनशक्ती संघटनेचे काम खूप चांगले आहेत. तुम्हाला महाराष्ट्रभर काम करायला जमेल का, पक्षासाठी फिरायला वेळ आहे का.?’ अशी विचारणा केली.

पुढे बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले की, खा. शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांच्या भेटीनंतर झालेल्या आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीसोबत काम करण्याबद्दल सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेमध्ये बोलताना पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या कोणता नेता कोणासोबत आहे.

यासह जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्राची त्यांनी माहिती घेतली. शिवाय याचबरोबर ते म्हणाले की जनशक्ती संघटनेने महाराष्ट्रभर अत्यंत चांगले काम केले आहे. विविध चैनल आणि दैनिकाच्या माध्यमातून आम्ही वाचत असतो.

हेही वाचा – करमाळा पंचायत समितीवर चक्क जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा मोर्चा; विद्यार्थ्यांवर का आली ही वेळ? शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर! वाचा सविस्तर

साहेब झालात.. सामाजिक बांधिलकी व सेवावृत्ती भाव कायम जपा, न्यायाच्या बाजूने भक्कम उभे रहा; जेऊर येथे यशवंत विद्यार्थ्यांना DYSP अजित पाटील यांचा सल्ला

त्यामुळे संघटना आमच्या सोबत आली तर खूप चांगले होईल असे सांगून राष्ट्रवादी पक्षासाठी महाराष्ट्रभर फिरायला जमेल का असे त्यांनी विचारले. शिवाय सध्याचे सुरू असलेले पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सविस्तर चर्चा करून लवकरच जबाबदारी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी दत्ता कापुरे, गणेश वायभासे, रोहन नाईकनवरे, विनीता बर्फे, गीता चापके, शबाना खान, नीता देशपांडे, माधवी सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!