करमाळा तालुक्यातील शेलगाव(वि.) येथील ऊस वाहतूकदाराला धुळे जिल्ह्यातील एका भामट्याने बारा लाखाला गंडवले
करमाळा (प्रतिनिधी); करमाळा तालुक्यातील शेलगाव वीराचे येथील ऊस वाहतूकदाराला धुळे जिल्ह्यातील एका भामट्या ऊस मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने तब्बल बारा लाख रुपयाला गंडवल्याची घटना करमाळा तालुक्यात घडली आहे याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.
विठ्ठल रिफाइंड साखर कारखान्याला ऊस वाहतुकीचा करार केल्यानंतर मजूर शोधण्यासाठी गेलेल्या करमाळा तालुक्यातील एका ऊस ठेकेदाराला ऊस मजूर शोधणे भलतेच महागात पडले आहे.
याबाबत मजूर ठेकेदाराने ऊस वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराकडून तब्बल 12 लाख रुपये घेतले होते तर नंतर ऊस वाहतूक दराने मजूर पुरवठा करणाऱ्य इसमाकडे वेळोवेळी मजूर पुरवठा करण्यासाठी तगादा लावला मात्र मजूर पुरवठा करणाऱ्या इसमाने ना मजूर दिले ना पैसे दिले म्हणजेच मजूर ही पुरवले नाही व घेतलेले पैसे देखील परत केले नाही.
धुळे जिल्ह्यातील बारका बजारिया पावरा राहणार खैखुटी तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे गुन्हा दाखल झालेल्या ऊस मजूर पुरवठा करणाऱ्याचे नाव आहे याबाबत ऊस वाहतूक दाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
नंतर त्यांनी करमाळा पोलीस स्टेशनला आपली फसवणूक झाल्याचे तक्रार दिली आहे महादेव दगडू वीर वय 39 राहणार शेलगाव वीराचे असे तक्रार देणाऱ्या ऊस वाहतूक दाराचे नाव आहे.
त्यांनी दिनांक 17 जुलै रोजी करमाळा पोलीस स्टेशन येथे आपली फसवणूक झाल्याचे तक्रार दिली आहे याबाबत करमाळा पोलीस स्टेशनला आज गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.
याबाबत मजूर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडून करमाळा तालुक्यात यापूर्वी अशा पद्धतीचे अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहे यावर आता शासनाने निर्बंध लावणे आवश्यक आहे असे ऊस उत्पादक शेतकरी वर्गामधून बोलले जात आहे.
Add Comment