राज्यस्तरीय हँडबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गरड यांचा जेऊर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार संपन्न
करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); विनोद गरड यांनी क्रिडा क्षेत्रात करमाळा तालुक्याची मान उंचावली असून यामुळे अनेक युवक हँडबॉल या खेळाकडे आकर्षित होतील असे प्रतिपादन शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुस्तीगीर व पंचायत समिती सभापती अतुल (भाऊ) पाटील यांनी केले. जेऊर या करमाळा येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी त्यांनी आपली भावना बोलून दाखवली.
जेऊर ग्रामपंचायत सदस्य तथा हँडबॉल मधील राज्यस्तरीय नामांकित माजी खेळाडू विनोद गरड यांनी नुकतेच राज्यस्तरीय हँडबॉल पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले व इथून पुढील राज्य व देशपातळी वरील हँडबॉल स्पर्धा मध्ये आता त्यांना पंच म्हणून नेमण्यात येणार असल्याने माजी आमदार नारायण पाटील कार्यालयाच्या वतीने व जेऊर ग्रामस्थांच्या वतीने विनोद गरड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती तथा डबल उप महाराष्ट्र केसरी अतुल पाटील, तालुक्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा अर्जुनराव सरक सर, माजी सरपंच भास्करभाऊ कांडेकर, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप, माजी उपसरपंच धनंजय शिरस्कर, सोसायटी अध्यक्ष महेश कांडेकर, संतोष पिसे, उमाजी नाईक संघटनेचे तालुकाध्यक्ष पोपटराव वाघमोडे, स्विय सहाय्यक सूर्यकांत पाटील,सुनील तळेकर, माजी उपसरपंच दत्तू नाना शिंदे (कुंभेज), माजी सदस्य रामेश्वर तळेकर (वंगी), आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सभापती अतुल पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी विनोद गरड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती पाटील म्हणाले की कोणत्याही खेळात पंच हे न्यायदानाचे काम करत असतात. आज राज्यस्तरीय पंच म्हणून हे पवित्र काम करण्याची संधी विनोद गरड यांना मिळाली याचा करमाळा तालुक्यास अभिमान आहे.
विनोद गरड यांनी या क्षेत्रात आपल्या अचूक व नियमाला धरून दिलेल्या निर्णयावर असेच नाव उज्वल करावे. विनोद गरड यांची प्रेरणा घेऊन अनेक युवक आता या खेळाकडे वळतील असा आशावाद अतूल पाटील यांनी व्यक्त केला.
Add Comment