करमाळा

Good News उजनीने केले अर्धशतक पार;  परतीच्या पावसाने दिला दिलासा, क्लिक करून वाचा आजची टक्केवारी!                                    

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

Good News उजनीने केले अर्धशतक पार; 

परतीच्या पावसाने दिला दिलासा, क्लिक करून वाचा आजची टक्केवारी!

                                                                                             केत्तूर (अभय माने) – यंदाच्या वर्षामध्ये लहरी पावसाचा फटका खरीप हंगामाला बसला असून या हंगामातील बाजरी, तूर, मूग, सोयाबीन, उडीद, कांदा, मका ही पिके पावसाअभावी करपून गेली मात्र सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केल्याने शेतकरी सुखावला आहे.

पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर मागील दहा ते बारा दिवसांपासून दमदार पाऊस झाल्याने उजनीच्या वरील बहुतेक सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने त्यामधून सोडलेले पाणी बंडगार्डन व दौंड मधून पोहोचले असल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग उजनीच्या दिशेने येत आहे. दौंडमधून येणारा हा विसर्ग चालू हंगामातील सर्वांत मोठा आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने उजनीच्या वरील बाजूस असलेली बहुतेक सर्व धरणे ओव्हरफ्लो झाले असून, आता पडणारे पावसाचे पाणी सरळ उजनीच्या दिशेनेच येत आहे.

 त्यामुळेच मागील दोन दिवसांपासून दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होत आहे. यंदाचा पावसाळा सुरु झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली सातारा कोल्हापुर सोलापूर व अहमदनगर मध्ये अल्प पाऊस झाला होता पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरली मात्र उजनी धरण माइनस निघून प्लस मध्ये येऊन थांबले होते मात्र पावसाचे भरोस्याचे दिवस निघून गेल्याने उजनी वर अवलंबून असणाऱ्या अहमदनगर व पुण्याच्या काही भागाबरोबरच सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र स्वरुपात जाणवू लागल्या होत्या.

 मात्र परतीच्या पावसाने दुष्काळा च्या झळया कमी होऊन रब्बीच्या पेरण्या होण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे उजनी धरणाने पन्नासी गाठल्यानंतर शेतकऱ्यांना शंभरी गाठण्याचे वेध लागले असताना पावसाचा जोर मात्र कमी होऊ लागला आहे उजनीच्या पाण्यावर उस केळी, डाळीब, पेरू ही बारमाही पिके अवलंबून असल्याने पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे .

 

सोलापूर पुण्याचं अहमदनगर जिल्ह्याची वरदानी समजले जाणाऱ्या उजनी धरणांनी रडतखेळत का होईना पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात अर्धशतकाचा टप्पा पार केल्याने संभाव्य दुष्काळजींनी परिस्थिती टाळण्याची काम केली आहे.   

    पावसाळ्यातील बहुतांश पावसाची नक्षत्रे ठाक गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती पावसाअभावी रंबे रब्बी हंगाम फेल गेला होता परंतु उजनी धरणावरील धरण साखळी तसेच पुणे जिल्हा परिषद व घाटमाथ्यावर पतीचा जोरदार पाऊस बरसल्याने उजनीच्या पाणीसाठा वाढला आहे गेल्या चार दिवसात पाच टीएमसी एवढे पाणी वाढले उजनी जमा झाले आहे.

   उजनी धरणावरील पानशेत वरसगाव खडकवासला ही धरणे पोट क्षमतेने भरली असून या धरणातून विसर्ग मुळा नदी सोडला जात आहे याचा मोठा फायदा उजनी धरणाला होत आहे.

 सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली केल्याने गणेशोत्सव काळात सुरू झाली होती त्यामुळे गणपती बाप्पा पावले असेच म्हणावे लागेल आता उर्वरित काम नवरात्रीत देवी आईने करावी व उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरली जावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांचे सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली जात आहे .

     उजनी जलाशयाचा पाणीसाठा वाढत असल्याने सोलापूर पुणे नगर जिल्ह्याच्या अर्थ करणाला दिलासा मिळणार असून उजनी लाभक्षेत्रातील साखर कारखाने तसेच ऊस उत्पादक फळबागा केळी पेरू पपई उत्पादकांना दिलासा मिळणार आहे .

एकूणच अशक्य वाटणारे उजनी जलाशयाची पाणी पातळी सध्या वाढत असल्याने शेती उद्योग व व्यापाराला दिलासा देण्याचे काम केले आहे.

उजनी ची सध्याची पाण्याची स्थिती

उजनी अपडेट 4/10/23

*एकूण पाणी पातळी* – 494.440 मिटर

*एकूण पाणीसाठा*- 2489 द.ल .घ.मी.(91.04टीएमसी)

*उपयुक्त पाणीसाठा*- 686.74 दलघमी (27.98 टीएमसी)

*उजनी मध्ये येणारा विसर्ग*- 14757 क्युरोस

*उजनीतून जाणारा विसर्ग* सिना माढा – 222 क्युरोस ,दहिगाव- 80 क्युसेस

*एकूण टक्केवारी*- 52.22 %

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!