ऊस उत्पादक संघाच्या तज्ञ संचालकपदी विजय निकत व संतोष इंगळे यांची निवड
केत्तूर (अभय माने): महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या तज्ञ संचालक पदी विजय भानुदास निकत व संचालकपदी.संतोष शहाजी इंगळे यांची निवड केली असून त्यांच्या निवडीचे ऊस उत्पादकामधून अभिनंदन होत आहे.
निकत व इंगळे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून स्वत: प्रयोगशील ऊस शेती करतात याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे संस्थापक अध्यक्ष भरतनाना माने-पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले असून महाराष्ट्र राज्य कार्यकारणी संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
ऊस उत्पादकांच्या अडीअडचणी समजून घेऊन आधुनिक प्रकारे ऊसाचे उत्पादन वाढीसाठी बेणे प्लॉट,खते,औषधे,मार्गदर्शन व माहीती शिबिर,आयोजित करून कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यामध्ये राज्यातील ऊस उत्पादकांनी सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी अतुलनाना माने- पाटील यांनी सांगितले.
Comment here