*हवामानातील बदलामुळे रब्बी हंगामातील पिके संकटात*
केत्तूर (अभय माने) कांद्याचे दर वरचेवर वाढत असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कांदा पिकाला पसंती दिली व कांदा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे मात्र गेल्या काही दिवसात हवामानातील बदलामुळे शेतकरी वैतागून गेला आहे.
ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकाची वाढ खुंटली आहे. त्यातच पिकासाठी पोषक असणारी थंडी कमी झाली आहे या वातावरणामुळे पिकावर महागडी औषधांची फवारणी करावी लागत आहेत त्यामुळे उत्पादकांच्या खर्चामध्ये भली मोठी वाढ झाली आहे. सध्या कांद्यावर मावा, करपा, बुरशी,बुरशीजन्य रोग तसेच पिवळेपणा दिसू लागला आहे.
हेही वाचा – पांडे येथे गणेश चिवटे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांचा आदर्श गाव पाटोदा ला अभ्यास दौरा
हवामानात वारंवार बदल होत असल्याने रब्बी हंगामातील पिके संकटात आली आहेत गहू, ज्वारी, मका, हरभरा या पिकावर संकट आले आहे.कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे व महत्त्वाचे आहे.