प्रहार शेतकरी संघटना माढा वतीने तहसील कार्यालयासमोर ‘या’ तारखेला हलगी नाद आंदोलन
वारंवार लेखी, तोंडी निवेदन देऊन देखील अपंगा बाबत प्रशासनाची उदासीनता
माढा प्रतिनिधी : प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने तहसीलदार माढा यांचे कडे वारंवार लेखी, तोंडी निवेदन देऊन देखील अपंगा बाबत उदासीनता दिसून येत आहे. माढा तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींना अंतोदय शिधा पत्रिकेमध्ये समावेश करणे बाबत प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने मागील आठवड्यात निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत पुरवठा विभागाची कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता अपंग शिधा पत्रिका लाभार्थ्यांचे कोणतेही समायोजन अंतोदय शिधा पत्रिकेमध्ये केलेले दिसून येत नाही.
तसेच माढा तालुक्यातील कमी झालेला लक्षांश पूर्ववत करावा असे ही निवेदन प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने माढा तहसीलदार यांना देण्यात आले. माढा तालुक्यातील 2013 पासून नवीन शिधा पत्रिका धारकांना धान्य मिळत नाही. पण माढा तालुक्यात मृत झालेले शेतकरी लग्न होऊन गेलेल्या मुली यांचा लक्षाश कुठे जातो असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
या संदर्भात अनेक वेळा आंदोलनाचा इशारा दिला होता परंतु दखल घेतली गेली नाही.
माढा तालुक्यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला असून या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन वंचित, गोरगरीब शिधा पत्रिका धारकांना अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करण्यात यावे अन्यथा 1 ऑगस्ट रोजी माढा तहसील कार्यालयासमोर प्रहार स्टाईल ने हलगी नाद आंदोलन करण्यात येईल.
पंडित साळुंके
प्रहार शेतकरी संघटना जिल्हा समन्वयक
भंगार विकणाऱ्याचा मुलगा झाला पिएसआय; प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आई वडीलांच्या कष्टाचे केले चीज
यावेेळी प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष संतोष कोळी, किरण लवटे, संदीप चव्हाण, स्वप्नील चव्हाण,पांडुरंग आरे, गणेश सुतार, गणेश पारडे, अण्णा सुतार, चैतन्य तांबीले उपस्थित होते.
Add Comment