करमाळाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

नेरले शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

नेरले शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा प्रतिनिधी –करमाळा तालुक्यातील जि. प.प्राथ.शाळा, नेरले  येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोशात साजरी करण्यात आली. गावच्या सरपंच  प्रतिभाताई समाधान दौंड या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या भीम जयंतीचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेत श्रुतिका धनंजय गवळी हिने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक तंजिला अलताफ मोमीन, तृतीय क्रमांक श्रुती बापू करे, तर स्वरांजली औदुंबरराजे भोसले-पाटील व स्वराली समाधान दौंड यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. सर्व विजेत्यांना ट्रॉफी,प्रमाणपत्र व रोख बक्षीस याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्य भूमीवर हे व अंधार फार झाला दिवा पाहिजे,या देशाला जिजाईचा शिवा व भिमाईचा भीमा पाहिजे या गाण्यावर अतिशय सुंदर असे लेझीम नृत्य सादर केले.

याप्रसंगी सरपंच  प्रतिभा समाधान दौंड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवानंद श्रीमंत पोळ, सामाजिक कार्यकर्ते समाधान दौंड, तानाजी हजारे, घोगरे सर,हंडाळ, सोनाली भालचंद्र काळे, पोळके मॅडम इ. इत्यादी हजर होते. मुलांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचे विचार सांगितले. समाधान दौंड यांनी विविध महापुरुषांची जयंती विविध उपक्रमांनी सादरी करावी असे सांगितले. दिपक ओहोळ सर यांनी बाबासाहेबांचे भारतासाठी मोलाचे योगदान सांगितले. मणेरी सर यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा – करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

नागराज मंजुळे यांच्या ‘घर बंदूक बिरयाणी’ ने दोन दिवसात जमावाला ‘इतका’ गल्ला! प्रेक्षकांना पार्ट 2 ची उत्सुकता..

या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग जाधव, शाळेतील शिक्षक अभय कुमार कसबे, विलास जाधव, रामचंद्र मोरे,शारदा आडेकर, जाकिर मनेरी व दिपक ओहोळ यांनी परिश्रम घेतले. शेवटी खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

litsbros

Comment here