आरोग्यकरमाळा

करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा; नियुक्ती असताना दीड वर्षापासून डॉक्टर गैरहजर; वाचा कुटीर रुग्णालयाचा पंचनामा!

केत्तूर (अभय माने): करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील तीन वैद्यकीय डॉक्टर सुद्धा गेली दीड वर्षापासून सातत्याने गैरहजर आहेत, शिवाय उपलब्ध असलेले डॉक्टरांचे आपल्या खाजगी प्रॅक्टिस कडे जास्त लक्ष असल्यामुळे शासकीय रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे.

गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळावे, रुग्णसेवा मिळावी म्हणून शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून करमाळ्यात उपजिल्हा रुग्णालय उभे केले आहे.
सध्या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे पण डॉक्टर नाही, हाडांचे डॉक्टर आहे पण ऑपरेशनची सोय नाही. बालरोग तज्ञ आहेत पण सुविधा नाही. दाताचे मशीन आहे पण नंतर रोग तज्ञ नाही, डोळ्याचे मशीन आहे पण डॉक्टर नाही. व्हेंटिलेटर मशीन आहेत पण ऑपरेटर नाही, स्वच्छतेसाठी कर्मचारी आहेत पण स्वच्छतेचा महापूर आहे,
सर्व अडचणीमुळे उपजिल्हा रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा झाला आहे.

तज्ञ डॉ. आवळे मॅडम गेली दीड वर्षापासून गैरहजर आहेत. त्यांना सोयीस्कर अशी परांडा येथे बदली हवी असल्यामुळे ते उपजिल्हा रुग्णालयात हजरच नसतात त्याचप्रमाणे हाडाचे डॉक्टर राऊत सुद्धा गेले दीड वर्षापासून गैरहजर आहेत.
नेत्ररोग तज्ञ डॉ.खटके उपलब्ध नसतात.
अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तात्काळ त्याला सलाईन मलमपट्टी करून सोलापूरला हलवण्याचे काम उपजिल्हा रुग्णालयात केले जाते.

किरकोळ जखमी असला तरी सोलापूरलाच पाठवायचे या भूमिकेमुळे सर्वांना त्रास होत आहे.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी गतवर्षी 49 हजार 621 आहे उद्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांची आवक असताना दर्जेदार सेवा मिळत नसल्यामुळे रुग्णांना नाईलाजाने खाजगी दवाखान्यात जाव लागत आहे.

सध्या डॉ. स्मिता बंडगर यांच्यामुळे प्रसुती विभागाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तसेच भूलतज्ञ सुमित पाटील 24 तास हजर असल्यामुळे महिलांच्या ऑपरेशन वेळेवर होत आहेत. एवढीच या जिल्हा रुग्णालयाची चांगली बाजू आहे.

धक्कादायक प्रकार म्हणजे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना कोणते सलाईन द्यायचे, कोणते गोळ्या द्यायच्या हे संबंधित डॉक्टर घरूनच फोनवर नर्सेस लोकांना सूचना देतात व नर्सेस मोबाईलवर आलेले सूचनेनुसार रुग्णांवर उपचार करतात असा धक्कादायक प्रकार रुग्णालयात सातत्याने घडत असतो.

करमाळा उपजिल्हा रुग्णालय सर्वसामान्य गोरगरिबांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे या ठिकाणाहून सर्व प्रकारचे उपचार व मोफत औषधी मिळतात मात्र योग्य नियोजन नसल्यामुळे व डॉक्टरांची संवेदनशीलता कमी पडत असल्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय पाटील यांनी तात्काळ करमाळा उपजिल्हा रुग्णालयाला पाहणी करून कमी असलेले डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत डॉक्टरांच्या समस्याही सोडवाव्यात व सर्वसामान्य रुग्णांना मोफत उपचार देण्यासाठी प्रयत्न करावेत असे शेवटी नागेश चेंडगे यांनी सांगितले.

नागेश चेंडगे

शिवसेना वैद्यकीय समन्वयक

litsbros

Comment here