*आधुनिक काळात कौशल्यपूर्ण शिक्षण ही काळाची गरज-कौस्तुभ गावडे*
केत्तूर ( अभय माने)
आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षण आत्मसात करावे, त्यासाठी शिक्षण मंडळाने आवश्यक तो बदल घडवून आणावा असे मत श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केले.
येथील नेताजी सुभाष विद्यालयातील सहशिक्षक लक्ष्मण बापू महानवर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सेवा गौरव कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते, यावेळी करमाळा-माढा विधानसभा आमदार नारायण आबा पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन आमदार नारायण आबा पाटील आणि कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कौस्तुभ गावडे पुढे म्हणाले की “आज शिक्षणात एक.आय. व रोबोटिक टेक्नॉलॉजी वाढत असून याचवेळी काही समाजकंटक समाजात भेदाभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी अशा समाजकंटकांच्यात बापूंचे शिक्षण विषयक विचार रुजवणे गरजेचे आहे. कारण शिक्षणामुळे माणसात माणुसकी निर्माण होते”
यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी सुद्धा आपले विचार मांडले ,ते म्हणाले की “50-60 वर्षांपूर्वी अनेक अडचणी असताना सुद्धा डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी निम्म्या महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात, डोंगर कपारीत शिक्षण केंद्र उभे केल्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण पोहोचले.
यानंतर श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था मराठवाडा विभाग प्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी वेळेत शिक्षक भरती न केल्याने शाळांमध्ये अनेक समस्या निर्माण होत असल्याची खंत आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केली.
डॉक्टर जिनेन्द्र दोभाडा व अशोक आबा पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दलचा आदर व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना सहशिक्षक लक्ष्मण महानवर यांनी आपले मत मांडले ते म्हणाले ,”सलग 39 वर्ष प्रामाणिकपणे तर सेवा केलीस, पण एखादा अधिकारी झालेला विद्यार्थी जेव्हा शिक्षकाजवळ जाऊन आशीर्वाद घेतो असे फार मोठे समाधान फक्त शिक्षकांच्याच नशिबात असते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेवा गौरव शिक्षक लक्ष्मण महानवर यांचा सपत्नीक सत्कार संस्था सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाला रायगड ,सातारा , कोल्हापूर, धाराशिव, बीड, पुणे , सांगली या जिल्ह्यातील शाळा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी, आरटीओ अधिकारी श्री.कचरे, डॉ. जिनेन्द्र दोभाडा, नागनाथ लकडे, माजी चेअरमन बाळासाहेब पांढरे, अजिव सेवक मारुती सोनवणे, माजी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश दाबके, उद्धव भोसले, नवनाथ झोळ, सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, बापूसाहेब पाटील, संतोष पाटील, अशोक आबा पाटील, श्रीकांत पाटील, प्रा. राजेश कानतोडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ॲड. संतोष निकम, उपाध्यक्ष प्रशांत पांढरे, प्रवीण नवले, किरण निंबाळकर, उदयसिंह मोरे-पाटील चिंतामणी कानतोडे, विजय येडे, शहाजी पाटील, नवनाथ राऊत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ।
शाळेचे प्राचार्य के.एल.जाधव यांनी प्रास्ताविक केले, के.सी.जाधवर यांनी सूत्रसंचालन केले, तर के.पी. धस यांनी आभार मानले.
“सेवानिवृत्तीनिमित्त श्री.लक्ष्मण महानवर यांनी नेताजी सुभाष विद्यालयातील प्रत्येक वर्गात एक याप्रमाणे सुमारे 55 हजार रुपये किमतीचे व्हाईट बोर्ड भेट दिले.