करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

मकाईच्या निवडणुकीमध्ये सविताराजे भोसले प्रा.रामदास झोळ यांच्या निवडणूक अर्जावर विरोधकाचा आक्षेप; निर्णय काय होणार? तालुक्याचे लागले लक्ष

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मकाईच्या निवडणुकीमध्ये सविताराजे भोसले प्रा.रामदास झोळ यांच्या निवडणूक अर्जावर विरोधकाचा आक्षेप; निर्णय काय होणार? तालुक्याचे लागले लक्ष

जेऊर प्रतिनिधी); मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी भिलारवाडी, चिखलठाण व पारेवाडी ऊस उत्पादक गटातून दाखल झालेल्या अर्जापैकी आक्षेप आलेल्या अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून निकाल राखून ठेवण्यात आला आहे. सदर चा निकाल येत्या सोमवारी जाहीर होणार असल्याचे समजते.

आज एकूण 35 अर्जावर आक्षेप घेण्यात आला असून या अर्जाची सुनावणी आज तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोपे यांच्यासमोर उशिरापर्यंत चालू होती मात्र शेवटी आक्षेप घेतलेल्या अर्जावर सोमवारी निकाल देण्यात येणार आहे

याप्रमाणेच आक्षेप आलेल्या सर्व अर्जाचे युक्तीवाद पूर्ण करुन घेतले जाणार आहेत. त्यानंतर निकाल दिला जाणार आहे.

भिलारवाडी गटात प्रविण बाबर यांच्या अर्जात त्रुटी आहे. याशिवाय रामचंद्र हाके, सुनिता गिरंजे, आप्पा जाधव, अंबोधरे, मंगल हाके व काशीनाथ काकडे यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणुक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्याकडे हे आक्षेप नोंदवण्यात आले. अजित झांजुर्णे व संतोष झांजुर्णे यांचे अर्ज पात्र झाले आहेत.


मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दाखल झालेल्या बहुतांश अर्जावर ‘अदिनाथचा अपूर्ण शेअर्स’, ‘सलग तीन वर्ष ऊस गाळप नाही’, ‘तीन आपत्य’ व ‘थकीत असलेबाबतचा दाखल’ असे अक्षेप आहेत. मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, प्रा. रामदास झोळ, बाळासाहेब पांढरे, रामभाऊ हाके, सुभाष शिंदे आदींच्या अर्जावर अक्षेप आले आहेत. निकाल काय येतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – हिंगणी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी बबनराव जाधव बिनविरोध, तर संचालक पदी..

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

अॅड. अमर शिंगाडे, अॅड. यु. बी. मराठे, अॅड. नानासाहेब शिंदे, अॅड. दत्तात्रय सोनवणे, अॅड. राजेश दिवाण, अॅड. प्रीयल अगरवाल, अॅड. प्रशांत मैंदर्गी, अॅड. रणजित साळुंखे आदी युक्तीवाद करत आहेत. सोमवारी होणाऱ्या या युक्तिवाद निकालाकडे संपूर्ण राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

litsbros

Comment here