केमसोलापूर जिल्हा

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

केम(प्रतिनिधी ओंकार जाधव); श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम याठिकाणी गुरुजन कृतज्ञता आणि 1981-82 बॅच माजी विद्यार्थी स्नेह मेळावा वार :-रविवार दि.07/05/2023 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

यावेळी या माजी विद्यार्थी स्नेह मेळावाचे अध्यक्ष  सी.डी यादव सर होते. यावेळी मा.श्री दिलीपदादा तळेकर यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात तब्बल 41 वर्षांनी सर्वजण एकत्र येऊन जुन्या शालेय आठवणींना उजाळा मिळाला.

सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन यादव सी.डी सर, प्राचार्य  कदम एस.बी सर यांनी केले. यावेळी सरस्वती पूजन  सी.डी यादव सर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन कांबळे सर, सोलापूरे सर, कदम सर, काळे सर, रघुनाथ शिंदे सर.जाधव मॅडम, भोसले सर, नारायण देवकर मामा ,बाळुमामा यांनी केले. यावेळी सर्वांचे गुलाब पुष्प,श्रीफळ,शाल देऊन स्वागत करण्यात आले. 1982 बॅच मधील जे माजी विद्यार्थी कालवश झाले आहे अशा माजी विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री उत्तरेश्वर हायस्कूलने अनेक संस्कारक्षम पिढ्या घडवल्या आहेत असे मत दिलीप दादा तळेकर यांनी व्यक्त केले. प्राचार्य  कदम एस.बी यांनी डॉ बापूजी साळुंखे आणि उत्तरेश्वर हायस्कूलचे केम मधील शैक्षणिक योगदान फार मोठे आहे असे विचार त्यांनी मांडले.

1981-82 बॅच माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष सी.डी यादव सर, सोलापूरे सर, काळे सर, कांबळे सर यांनी उत्तरेश्वर हायस्कूल विषयी आपले मत व्यक्त केले.

माजी विद्यार्थ्यामध्ये तानाजी तळेकर, रघुनाथ शिंदे, स्वाती दिक्षित, हसीना मुलानी, ज्योत्स्ना शहा, प्रकाश‌ कोरे, डॉ शाम लोंढे, राजकुमार गुळवे, सुहास पोळके, सर्जराव तळेकर यांनी उत्तरेश्वर हायस्कूल विषयी आपले मत व्यक्त केले. व जुन्या शालेय आठवणींना उजाळा दिला. यावेळी 1981-82 बॅच मधील या माजी विद्यार्थ्यांनी शालेय बांधकामांसाठी 25 सिमेंटचे पोते दिले.

हेही वाचा – धर्मवीर संभाजी महाराज जयंती निमित्त केत्तूर येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान; लाखोंची बक्षिसे

चिंताजनक; अखेर सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरण मायनसमध्ये; क्लिक करून वाचा किती उरला पाणीसाठी

यावेळी कांबळे सर, सोलापूरे सर, कदम सर, जाधव मॅडम, शिंदे सर, भोसले सर, काळे सर नारायण देवकर मामा , बाळुमामा मान्यंवराची उपस्थिती होती. या 1981-82 बॅच माजी विद्यार्थी मेळाव्याचे सुत्रसंचलन डॉ.शाम लोंढे आणि ज्योत्स्ना उर्फ स्वप्ना शहा यांनी केले.

या कार्यक्रमास 1981-82 बॅच मधील 45 माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी आभार . प्रकाश कोरे सर यांनी मानले.

litsbros

Comment here