करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

करमाळयात मस्जिद वरुन मिरवणुकीतील श्री गणरायावर पुष्पवृष्टी; हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन, वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळयात मस्जिद वरुन मिरवणुकीतील श्री गणरायावर पुष्पवृष्टी; हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन, वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख);
करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने श्री गणेश विसर्जन मिरवणूकी निमित्त सुभाष चौक येथे श्री देवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाच्या श्री गणरायाच्या मिरवणूकीचे स्वागत फुलांची पुष्पवृष्टी करुन करण्यात आली असुन सर्व गणेश भक्ताना ईद निमित्त शेरणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या हस्ते मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी चा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने पोलीस उपनिरीक्षक माहुरकर अमोल लावंड यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी हाजी अल्ताफशेठ तांबोळी माजी नगरसेवक फारुक जमादार हाजी फारुक बेग वाजीद शेख मजहर नालबंद इमरान घोडके साबीर तांबोळी मोहसिन पठान शाहरुख पठान सलिम ताबोळी आयुब बागवान जिलाणी खान मोहसिन तांबोळी, अफजल शेख आदी जण उपस्थित होते

तसेच वेताळ पेठ येथील जामा मस्जिद ट्रस्ट व जमात च्या वतीने श्री गणेश विसर्जन मिरवणूकी वर पुष्पवृष्टी करण्यात आली गेली कित्येक वर्षा पासुन मुस्लिम बांधव अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणूकीत गणरायावर पुष्पवृष्टी करत आलेले आहे तसेच गणेश उत्सव मंडळाच्या सर्व अध्यक्ष पदाधिकारी व पोलीस अधिकारी चा सत्कार देखील यावर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी करण्यात आला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मस्जिद ट्रस्ट चे विश्वस्त जमीर सय्यद हाजी उस्मान सय्यद माजी नगरसेवक फारुक जमादार हाजी युसूफ नालबंद नासीरभाई कबीर रमजान बेग आझाद शेख सुरज शेख मुस्तकीन पठान ईमत्याज पठान जिशान कबीर राजु बेग युसूफ बागवान जहांगीर बेग सद्दाम मुलाणी अरबाज बेग आदी जणांनी परिश्रम घेतले.

सामाजिक एकोपा तसेच हिंदू मुस्लिम भाईचारा अबाधित राहावा म्हणून विविध सामाजिक उपक्रम,,,,,
हाजी अल्ताफ भाई तांबोळी

करमाळा शहर तालुक्यात हिंदू मुस्लिम एकोपा कायमस्वरूपी आबादित राहावा तसेच सामाजिक सलोखा कायमस्वरूपी टिकावा म्हणून आम्ही व आमचे थोरले बंधू ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष तसेच करमाळा शहर तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान तांबोळी मुस्लिम बांधव प्रत्येक वर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत असल्याची माहिती ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे प्रांतिक अध्यक्ष तसेच करमाळा शहर तसेच तालुका मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान भाई तांबोळी तसेच नगरसेवक तसेच करमाळा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष हाजी अल्ताफ भाई तांबोळी यांनी बोलताना दिली दरवर्षी पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत अन्नदान तसेच रमजान ईद निमित्त मौलाली नगर येथील अनाथ गरजू मदारी समाजातील लोकांना मोफत शीरखुर्मा साहित्य वाटप असे विविध सामाजिक उपक्रम आजपर्यंत राबवित आलेलो आहेत.

हेही वाचा – करमाळा शहरातील केके लाईफस्टाईल मध्ये रोजगाराची संधी; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

पर्यटन विभागाच्या निधीतून कमलाभवानी देवस्थानची 1 कोटींची कामे पूर्ण; 3 कोटी निधीची ‘ही’ कामे प्रगतीपथावर

याशिवाय मी सध्या जय महाराष्ट्र नागरी पतसंस्थेचा अध्यक्ष तसेच कमलादेवी औद्योगिक विकास महामंडळाचा उपाध्यक्ष तसेच रूपचंद तालीम मंडळाचा देखील मार्गदर्शक आहे असेही हाजी अल्ताफ तांबोळी बोलताना म्हणाले

litsbros

Comment here