करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
श्री संत एकनाथ महाराज पालखी निमित्त सिना कोळगाव धरणातून पाणी सोडण्याची ‘ या’ गावाने केली मागणी
माढा (प्रतिनीधी): श्री संत एकनाथ महाराज पालखी येत्या 22 जून 2023 रोजी मुंगशी ता. माढा या गावांमध्ये येणार असून या पालखीमध्ये दहा ते पंधरा हजार वारकरी संख्या असून या वारकऱ्यांच्या आंघोळी व कपडे धुण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सीना कोळेगाव धरणा मधून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे समस्त ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आली.
संजय मामा शिंदे यांना निवेदन देताना मारुती जगताप रोहिदास मोरे हनुमंत महाडिक रामलिंग धनाने बंडू जगताप महादेव महाडिक ऋषी सुरोशे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Add Comment