माढाराजकारणसोलापूर जिल्हा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बहुजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त अंजनगाव खेलोबा येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बहुजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त
अंजनगाव (खे) येथे वृक्षारोपण व खाऊ वाटप

माढा / प्रतिनिधी – मागील पाच ते सहा दशकांच्या राजकीय कारकीर्दीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून देशाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार यांनी कष्टकरी शेतकरी व बहुजनांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.संपूर्ण पवार कुटुंबीयांसह देशातील व राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात असे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले आहे.

ते अंजनगाव (खे.) ता.माढा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार बबनराव शिंदे व जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करताना प्रमुख पाहुणे म्हणून शनिवारी 10 जून रोजी बोलत होते.

सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव व आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक करून आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे तालुका उपाध्यक्ष विनायक चौगुले यांनी मानले.
यावेळी माढा येथील सन्मती ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे नूतन संचालक तथा उपसरपंच भागवत चौगुले यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव,चेअरमन पांडुरंग चौगुले, उपसरपंच भागवत चौगुले,युवानेते प्रदीप चौगुले,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे तालुका उपाध्यक्ष विनायक चौगुले,अंकुश लटके,महादेव गडेकर,बतुवेल रावडे,

हेही वाचा – तालुक्यातील प्रत्येक गावाने आदर्श घ्यावा अशी बातमी; लोकवर्गणीतून उभारलेल्या वाचनालयामुळे पूर्व सोगावमधील नऊ तरुण झाले पोलीस भरती

निकाल मुलांचा की पालकांचा.? प्रत्येक विद्यार्थी व पालकांने वाचावा असा लेख

अंगणवाडी शिक्षिका रेणुका चौगुले,चैत्राली लटके, सुरेखा जाधव,अश्विनी रावडे,हर्षदा कोरके,धनश्री वाघमोडे,सानिका गडेकर,चंद्रकांत देवकते,हिराचंद रावडे,संतोष पाटेकर,दिलीप वाघमोडे, रामचंद्र चौगुले,अजिंक्य पाटील,आनंद पाटेकर,समाधान नाईक,रमेश गिराम, सुवार्तिक नाईक यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी -अंजनगाव (खे) ता.माढा येथील कार्यक्रमात बोलताना आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव,चेअरमन पांडुरंग चौगुले व इतर मान्यवर.

litsbros

Comment here