करमाळाधार्मिकसोलापूर जिल्हा

मुस्लीम ओबीसींच्या न्यायासाठीचा लढा अधिक तीव्र करणार; नवनियुक्त अध्यक्ष ऍड. नईम काझी यांची ग्वाही

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मुस्लीम ओबीसींच्या न्यायासाठीचा लढा अधिक तीव्र करणार; नवनियुक्त अध्यक्ष ऍड. नईम काझी यांची ग्वाह

करमाळा(प्रतिनिधी);
ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटनेच्या करमाळा तालुका अध्यक्ष पदी ऍड. नईम काझी यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार बहुजन विकास संस्था, भारत मुक्ती मोर्चा, रहेनुमा बचत गट, बहूजन विकास बचत गट, करमाळा वकील संघाच्या वतीने करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना ऍड. नईम काझी म्हणाले कि, मुस्लीम ओबीसीं बांधवाना जात पडताळणी वेळेस, जातीचा दाखला काढतेवेळेस अनंत अडचणी येतात याचे निवारण होईपर्यंत तत्सम कागदपत्रासह पूर्ण वेळ देऊन अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत ज्या कोणाच्या अडचणी असतील त्यांनी समक्ष संपर्क करावा असे आवाहन ऍड. नईम काझी यांनी केले.

यावेळी बहुजन विकास संस्थाचे अध्यक्ष इसाक पठाण, भारत मुक्ती मोर्चा आर. आर. पाटील, कय्युम शेख, ऍड. अलीम पठाण, ऍड. योगेश शिंपी आदी मान्यवरांनी ऍड. नईम काझी यांचा पुष्पहार, शाल व पुस्तक देऊन शुभेच्छापर आपले विचार मांडले.

यावेळी अमोल नाळे, तौफिक शेख, अमीन बेग, सादिक काझी, पत्रकार अश्पाक सय्यद, मोईज सय्यद, अरुण माने, गौतम खरात, दिनेश माने, दीपक भोसले, रवी गोडगे, योगेश नरळे, दिनेश दळवी, बबलू पठाण, आफताब मुलाणी, सैफअली खान, इलाई अत्तार, फुरकान काझी, शरीफ दारुवाले, युसुफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा – ८७ महिन्यांचा थकीत पगार न मिळाल्याने ‘आदिनाथ’ चा दिव्यांग कर्मचारी मागतोय करमाळ्यातील गल्ली बोळांतून भीक; बागलांनी राजकीय आकसातून घरी बसावल्याचा आरोप

अडीच वर्षे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्रीपद भोगणाऱ्यांना जनतेचे प्रश्न काय समजणार; करमाळयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल; पवार कुटुंबावरील ही नाव न घेता केली जहरी टीका

तसेच यावेळी विविध कार्यकारी सोसायटीच्या संचलक पदी बनकर यांची तर उत्कृष्ट कामगिरी बद्दल ऍड. अलीम पठाण यांना पुरस्कार मिळाल्याबदल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहूजन विकास बचत गटाचे अध्यक्ष जमीर मुलाणी यांनी केले तर आभार मुबीन बागवान यांनी मानले.

litsbros

Comment here