करमाळा सोलापूर जिल्हा

कुंभेज येथे प्रमुख पाहुण्यांसह 109 रक्तदात्यांनी केले ऊस्फुर्त रक्तदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कुंभेज येथे प्रमुख पाहुण्यांसह 109 रक्तदात्यांनी केले ऊस्फुर्त रक्तदान

केतूर (अभय माने) कुंभेज (ता.करमाळा) येथील ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयात सोलापूर जिल्हा शिवस्फूर्ती समूहाचे जिल्हाध्यक्ष अनिल कादगे यांचे वतीने जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे औचित्य साधत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यान तब्बल 109 जणांनी रक्तदान केले.
सोलापूर जिल्हास्तरीय कृषी पुरस्कार प्राप्त हर्षालीताई प्रशांत नाईकनवरे व आदर्श शिक्षीका रेखा शिंदे-साळुंके यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वराज्य जननी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर जिजाऊ वंदन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी व्यासपीठावर शिवस्फूर्ती समुहाचे जिल्हा अध्यक्ष अनिल कादगे यांचे समवेत प्रमुख पाहूणे हर्षालीताई नाईकनवरे, प्रशांत नाईकनवरे, कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल,आदर्श शिक्षिका रेखा शिंदे-साळुंके, प्रदेश उपाध्यक्ष अक्षय तळेकर, सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नि.मेजर अक्रुर शिंदे , प्रयोगशिल शेतकरी नानासाहेब साळुंके, पत्रकार गजेंद्र पोळ, उदय देशमुख, पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, नि.सुभेदार मेजर बिभिषण कन्हेरे. कानिफनाथ गुटाळ, युवराज भोसले, नितीन भोसले, दत्ता रेगुडे, बाळासाहेब तोरमल, सुरेखा अनिल कादगे उपस्थित होते.

मान्यवरांचा सन्मान करून त्यानंतर रक्तदान शिबीरास प्रारंभ करण्यात आला. रक्तदान शिबीरासाठी येणाऱ्या मान्यवरांनीही रक्तदान करायला हवे असे मत व्यक्त करत प्रमुख पाहुणे म्हणून आलेले प्रशांत नाईकनवरे यांनी स्वतः रक्तदान करून नवीन विधायक पायंडा पाडला. ऋषीकेश भोसले या तरुणाने अंगावर शहारे आणणारी गगनभेदी शिवगारद दिली. कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल संवाद साधताना म्हणाले की, स्वराज्य जननी जिजाऊ मासाहेबांचा करारी बाणा अंगीकारत महिला भगिनींनी वाटचाल केल्यास आपले श्रेष्ठत्व निश्चित समाजमान्य होईल याबरोबरच सर्वांनी स्त्रीत्वाचा आदर सर्वत्र करायला हवा असे मत व्यक्त केले.

दहावीतील विद्यार्थिनी प्रणीता राजेंद्र गुटाळ हीने समारंभा दरम्यान केलेल्या जिजाऊंच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तोरमल यांनी केले.पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांनी तरुणांचा रक्तदानासारख्या विधायक कार्यातील ऊत्स्फुर्त सहभाग आदर्श व सर्वांना अनुकरणीय असल्याचे मत व्यक्त करुन उपस्थित युवकांचे अभिनंदन केले. या समारंभप्रसंगी मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर, यांनी रक्तदान शिबीरास भेट देत शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित

मकाईचे थकीत ऊस बिल 25 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना न मिळाल्यास प्रा. झोळ आत्मदहन करणार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

यावेळी विनोद कादगे, वैभव कादगे, ऋषीकेश भोसले, कुमार कादगे, आण्णासाहेब भोसले, लहू माने ऋषिकेश नलवडे, महावीर भोसले, श्रीराम शिंदे, गणेश सूर्वे, संदेश पोळ, अमोल मुटके सर, प्रशांत पवार, सुहास पोळ, महादेव पोळ, रमेश सुरवसे, अतुल भोसले, रवी काटे, विजय शिंदे, प्रवीण चौगुले, अरविंद कन्हेरे, सुदेश माने, निखिल काळे, अक्षय वीर,समाधान रगडे राकेश कन्हेरे आदिसह कुंभेज व परिसरातील तरुण मित्र मोठया संख्येने उपस्थित होते. अनिल कादगे यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!