करमाळा

आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आवाटीचे माजी सरपंच संजय नलावडे उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने अजित पवार यांच्या हस्ते सन्मानित

करमाळा (प्रतिनिधी); 

 करमाळा तालुक्यातील आवाटी येथील माजी सरपंच तसेच पुणे येथील शिवांजली बिल्डरचे उद्योजक संजय दामोदर नलावडे यांचा पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने सन 2023 चा उत्कृष्ट उद्योजक म्हणून नुकताच पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

 सदरचा सन्मान हा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांच्या हस्ते तसेच राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे उपस्थित होते.

संजय नलावडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुणे येथे उद्योग क्षेत्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवले आहे. उद्योग क्षेत्रात नावलौकिक मिळवल्यामुळे त्यांचा हा सन्मान करण्यात आला त्यांच्या या यशाबद्दल आवाटी ग्रामस्थांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

litsbros

Comment here