पंढरपूरसोलापूर जिल्हा

दुःखद – करकंब येथे शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुःखद – करकंब येथे शेततळ्यात बुडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

उपळवटे(प्रतिनिधी); पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील तीन शाळेकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे करकंब गावावर मोठी शोककळा पसरली आहे मोडनिंब रोड लगत असलेल्या परदेशी यांच्या शेतीच्या पाण्याच्या टॅंक मध्ये पडून तीन शाळेकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक १३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 रोजी करकंब शहरालगत असलेल्या मोडनिंब रोडवरील परदेशी यांच्या शेतात असलेल्या पाण्याच्या टॅंक मध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब व आजूबाजूच्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली होती.

हेही वाचा – स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

आदिनाथ कारखान्यातील बेकायदेशीर भंगार मालाची विक्री निविदा रद्द करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.

या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून मनोज अंकुश पवार (वय वर्ष ११) गणेश नितीन मुरकुटे (वय वर्ष ७) हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय वर्षे ९) या शाळेकरी मुलांना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककाळात पसरली होती.

litsbros

Comment here