करमाळाशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

मकाईचे थकीत ऊस बिल 25 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना न मिळाल्यास प्रा. झोळ आत्मदहन करणार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मकाईचे थकीत ऊस बिल 25 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना न मिळाल्यास प्रा. झोळ आत्मदहन करणार; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा (प्रतिनिधी); मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल 25 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांनी असे सांगितले आहे असे मत सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिल मिळण्यासाठी आयोजित केलेल्या प्रादेशिक सहसंचालक साखर संघ शेतकरी मकाई संचालक मंडळ पदाधिकारी बैठकीत व्यक्त केले .

मकाई सहकारी साखर कारखान्याचे मागील वर्षाचे थकीत ऊस बिल शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली .

या बैठकीमध्ये प्राध्यापक रामदास झोळसर शेतकरी कामगार पक्षाचे दशरथ अण्णा कांबळे, ॲड राहुल सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, शेतकरी प्रतिनिधी हरिदास मोरे अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने शेतकरी बांधव उपस्थित होते तसेच मकाई कारखान्याच्या वतीने मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर कार्यकारी संचालक हरिचंद्र खाटमोडे तसेच सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. या बैठकीत मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल मागील वर्षीपासून थकीत असून ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी प्राध्यापक रामदास झोळसर नेतृत्वाखाली करण्यात आली.

थकीत ऊस बिलाचा मुद्दा उपस्थित करून मकाई सहकारी साखर कारखान्यांनी ऊस बिल थकवल्यामुळे शेतकऱ्यावर सावकारी कर्ज काढून मुलांचे शिक्षण लग्न दवाखाना करण्याची पाळी आली आहे. आम्ही वारंवार शेतकरी ऊस बिल मिळण्यासाठी धरणे आंदोलन बोंबाबोब आंदोलन याचबरोबर थू थु आंदोलनही केले आपण याची गांभीर्याने दखल घेऊन ऊस बिल मिळण्यासाठी आम्हाला शब्द दिला आहे.

शेतकऱ्याकडून कर्तव्यदक्ष अधिकारी या नात्याने आपणाकडून आम्हास आपण कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांना योग्य समज देऊन आमचे बिल मिळून देत मिळून द्याल अशी अपेक्षा आहे. 25 जानेवारीपर्यंत आम्ही आपल्या शब्दाला मान देऊन थांबू 25जानेवारी पर्यंत शेतकऱ्याची ऊस बिल खात्यावर जमा न झाल्यास 26 जानेवारीला आम्ही सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर सांगितले.

याबाबत मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बागल गटाची युवा नेते दिग्विजय बागल म्हणाले की आम्ही मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल देण्यासाठी कटिबद्ध असून कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर शेतकऱ्यांना ऊस बिल मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मकाई साखर साखर कारखान्याच्या भवितव्याच्या दृष्टीने व आमच्या गटाच्या दृष्टिकोनातून आम्ही शेतकऱ्याची ऊस बिल लवकरात लवकर देऊ असे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्राध्यापक रामदास झोळसर सर मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर संचालक मंडळ कार्यकारी संचालक शेतकरी बांधवांमध्ये सविस्तर चर्चा करून मकाई सहकारी साखर कारखान्याची ऊस बिल लवकरात लवकर मिळेल त्यासाठी मकाई सहकारी साखर कारखाना चेअरमन व संचालक मंडळाला तशा सूचना आदेश त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा – खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील ‘या’ गावातील विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर

श्री खिलोबा विद्यालयाचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न संस्थेचे सचिव सुभाष नागटिळक यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजन

एकंदर मकाई सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ प्राध्यापक रामदास झोळसर सर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांना ऊस बिल मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून येत्या 25 जानेवारी पर्यंत आपण ऊस बिल मिळण्यासाठी थांबा त्याअगोदर शेतकरी बांधवांना ऊस बिल मिळेल असा शब्द मिळाला आहे त्यामुळे प्राध्यापक रामदास झोळसर सर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना नक्की ऊस बिल मिळेल अशी शक्यता असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

25 जानेवारीपर्यंत ऊस बिल न मिळाल्यास 26 जानेवारीला शेतकरी बांधवांसह सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर सर यांनी सांगितले आहे.

litsbros

Comment here