करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यातील खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यातील खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली

करमाळा(प्रतिनिधी);
तालुक्यातील खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली करण्यात आली आहे.सिना नदीकाठी वसलेल्या खडकी गावात घरगुती वीज जोडणी ग्राहकाकडून महावितरण कंपनीने शंभर टक्के वीज बिल वसुली करून थकबाकी शून्य केली आहे.

महावितरण कंपनीचे विद्यमान वायरमन सुनील विठ्ठल कामटे यांनी ही विज बिल वसूल करण्याचा दुसऱ्यांदा मान पटकावला आहे. हा मान त्यांनी महावितरण कंपनीच्या उपविभागीय अंतर्गत दुस-यांदा मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्यावर्षी ही त्यांनी घरगुती विज जोडणी धारकाची थकबाकी शून्य केली होती.

यंदाही थकबाकी शून्य केल्याने
वीज वितरण कंपनी चे उप कार्यकारी अभियंता सुमित जाधव तसेच शाखा अभियंता सुनील पवार (करमाळा ग्रामीण दोन) यांनी त्यांचा पेढा भरवून श्रीफळ ,फेटा देऊन सन्मान केला आहे.
यावेळी महावितरण कंपनीचे ग्रामीण एकचे शाखा अभियंता कार्तिक वाघमारे तसेच करमाळा शहर शाखा अभियंता रघुनाथ शिंदे उपस्थित होते.

हेही वाचा – अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त जागांची भरती सुरू; करमाळा तालुक्यातील उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर-दौंड-सोलापूर या नवीन गाडीचे पारेवाडी येथे जंगी स्वागत; कुठल्या स्थानकावर किती वाजता असेल गाडी? वाचा क्लिक करून

सुनील कामटे यांनी केलेल्या थकबाकी वसुली चे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचा आदर्श इतर कर्मचा-यांनी घ्यावा असे आवाहन उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव व शाखा अभियंता सुनील पवार यांनी केले आहे.

यावेळी ओंकार ढेरे, बिभीषण शेरे, मनोहर साळुंखे, गणेश क्षीरसागर, अजिंक्य साठे ,वडगावचे सरपंच बालाजी अंधारे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे शिवशंकर जगदाळे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांचे आभार सुनिल कामटे यांनी मानले.

litsbros

Comment here