राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध करमाळयात काँग्रेसचे जेल भरो आंदोलन; अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक
करमाळा( प्रतिनिधी अलीम शेख);
करमाळा(प्रतिनिधी); आज़ सकाळी अकरा वाजता काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे काॅग्रेस नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्तेनी आज पोलीस स्टेशन मध्ये जेल भरो आंदोलन केले यावेळी शेकडो कार्यकर्त उपस्थित होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक भुजबळ यांनी चाळीस कार्यकर्तैना अटक केली.
यामध्ये काॅग्रेस नेते सुनील बापु सावंत फारूक जमादार हरिभाऊ मंगवडे देवा लोंढे रविन्द्र कांबळे मनोज राखुंडे मनोज गोडसे महीला नेत्या निलावती कांबळे असलम हुसेन नालबंद, राजेन्द्र वीर,बापु उबाळे, गणेश झोळे राजु नालबंद साजीद बेग वाजीद शेख पांडुरंग सावंत हरीभाऊ भांड मंगेश सिरसट केतन इंदुरे खलील मुलाणी समीर शेख़ नागेश उबाळे योगेश काकडे अर्जुन आगम विठ्ठल इवरे शफीक शेख मुश्ताक पटवेकर अल्लीभई पठान जावेद शेख सुखदेव उबाळे रमेश हवालदार अनिल रोड़े मयुर घोलप हर्षद भिसे बंडु मोरे गणेश अडसुळ नागेश कसाब विकास पवार अभिजीत सावंत, पप्पू रंधवे गणेश सावंत,मंजुर शेख़ संभाजी गायकवाड़ आयास शेख युसूफ शेख मजहर नालबंद रोहित सावंत रामा करंडे नवनाथ गोड़से पानाचंद झिंजाडे बाळासाहेब उबाळे आदी कार्यकर्ते या जेल भरो आंदोलनात सहभागी होते या आंदोलनाच्या वेळी मनोज राखुंडे, हनुमंत मांढरे देवा लोंढे यांची भाषणे झाली.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले की,काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या देशात भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये काॅग्रेस पक्षा बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे कार्यकर्तेत एक प्रकार ची ऊर्जा निर्माण झाली आहे गांधी घराण्याचा इतिहास पाहीला तर त्यांच्या आजी स्वर्गीय इंदिरा गांधी वडील स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले हे विसरून चालणार नाही.
अश्या या घराण्यातील नेतृत्व राहुल गांधी यांना सुध्दा कुटील नितीने भा ज प सरकार ने लोकसभा अध्यक्षा मार्फत दबाव आणुन सचिवालयाकडुन त्यांची खासदारकी रद्द केली परंतु आता संपुर्ण भारतातील जनता आता पेटुन उठली आहे आणि या हुकूमशाही सरकार च्या विरोधात जनता आक्रमक होऊन रस्त्यावर उतरली आहे.
या देशात मोदी सरकार आल्यापासुन अनेक उद्योगपतीने बॅकेचे कोटीने कर्ज घेवून परदेशात पळून जात आहे आणि या पळुन जाणारेना चोर म्हटले तर शिक्षा होते ज्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोशारी नी आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल अपशब्द काढले तर त्याच्यावर साधा गुन्हा सुध्दा दाखल होत नाही
सध्या देशाची हुकुमशाही कडे वाटचाल चालु आहे आदानी सारख्या उद्योग पतीचा खरा चेहरा देशातील जनतेसम़ोर आणल्याने ते राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे सध्या भारतातील सर्व विरोधी पक्षाच्या नेते मंडळीनी एकत्रित येऊन भाजप सरकार चा खात्मा करण्याची वेळ आलेली आहे.
आणि सर्व विरोधी पक्षाची एकजुट नाही झाली तर छोटे छोटे पक्ष संपुन जातील आणी हुकुमशाही चे राज्य येईल सध्या महागाई प्रंचड प्रमाणात वाढलेली आहे याकडे असलेले जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप सरकार कुटील नितीचा वापर करुन विरोधी गटाला संपवत आहे.
खासदार हे लाखों मतदाराचा लोकप्रतिनिधि असतो त्याला असे अपात्र करणे हे योग्य नाही अनेक नेत्यांचे कोर्टात केसेस चालु आहेत परंतु त्याचा निकाल वर्षानुवर्ष लागत नाही तो पर्यंत त्याची टर्म सुध्दा पुर्ण होते परंतु राहुल गांधी यांच्या बाबत कोर्टाने एवढ्या लवकर निर्णय दिला आहे म्हणजेच हां पुर्व नियोजित कट आहे या वेळी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता.
Comment here