केत्तूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी भास्कर भगवान कोकणे यांची बिनविरोध निवड
केत्तूर प्रतिनिधी – केत्तूर ग्रामपंचायत ची पंचवार्षिक निवडणूक मध्ये प्रभाग क्रमांक १ मधुन निवडुण आलेले भास्कर भगवान कोकणे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
निवडी नंतर बोलताना कोकणे म्हणाले माजी सभापती बापुसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी निवडून आलो असुन गावच्या विकासासाठी मी कटीबद्ध आहे.केत्तूर हे गाव उजनी धरण प्रकल्प ग्रस्त असुन केत्तूर नं १ व केत्तूर नं २ येथील प्रश्नावर व श्री किर्तेश्वर देवस्थान चे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
हेही वाचा – करमाळा तालुक्याला अधिकृत तहसीलदार मिळावे म्हणून सोमवारी बोंबाबोंब आंदोलन; वाचा सविस्तर
करमाळा सकल मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार संजय मामा शिंदे यांचा विशेष सत्कार संपन्न
निवडी नंतर कोकणे यांचे बापुसाहेब पाटील,भिमराव येडे,नवनाथ राऊत,लालासाहेब कोकणे,बाळासाहेब कोकणे,बाळासाहेब भरणे,लक्ष्मीकांत पाटील,रामदास राऊत,दत्तात्रय कोकणे,अंबादास कानतोडे,रामचंद्र गावडे, छगन मिंड,चंद्रशेखर कोकणे,अनिल राऊत,हनुमंत कानतोडे,संतोष कोकणे,हनुमंत गुलमर, किर्तेश्वर कोकणे, सचिन राऊत यांनी अभिनंदन करून सत्कार केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून म्हेत्रे यांनी कामकाज पाहीले.
Comment here