करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

रावगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी ज्ञानेश्वर जाधव यांची बिनविरोध निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

रावगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी ज्ञानेश्वर जाधव यांची बिनविरोध निवड..

करमाळा प्रतिनिधी-. नुकत्याच निवडणूक झालेल्या रावगाव ग्रामपंचायत उपसरपंच पदी ज्ञानेश्वर जाधव यांची बिनविरोध निवड झाली. रावगाव ग्रामपंचायत मध्ये बागल पाटील युतीला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले होते. युतीचे सरपंच रोहिणी शेळके या ६०० च्या वरती मतांनी विजयी झाल्या होत्या.


आज झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करून गावकर्यांसमोर नविन आदर्श मांडला आहे.
रावगावच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेच्या विश्वासाला पात्र होऊन, समंजसपणे , पदाला महत्व न देता जनतेचे सरपंच संदिप शेळके यांच्या खांद्याला खांदा देऊन जनतेच्या विकास कामाला महत्व दिले जाईल असे मत नवनिर्वाचित उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – अंजनगाव खेलोबा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी अरुणा चौगुले; खेलोबा आघाडीची एकहाती सत्ता; क्लिक करून वाचा विजयी उमेदवार

कंदर ग्रामपंचायत अटीतटीच्या लढतीत सरपंच पदी जगताप गटाचे मौला साहेब मुलाणी यांचा बहुमताने दणदणीत विजय; वाचा सविस्तर आकडेवारी सह विजय उमेदवार यादी

सरपंच संदिप शेळके यांनी ज्ञानेश्वर जाधव यांचे अभिनंदन केले आणि पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गावातील समस्त रावगावकर उपस्थित होते.

litsbros

Comment here