करमाळामाढासोलापूर जिल्हा

चिंताजनक; अखेर सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरण मायनसमध्ये; क्लिक करून वाचा किती उरला पाणीसाठी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

चिंताजनक; अखेर सोलापूर जिल्ह्याची जीवनदायिनी उजनी धरण मायनसमध्ये; क्लिक करून वाचा किती उरला पाणीसाठी

केत्तूर (अभय माने) सोलापूर बरोबरच पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदानी असणारे उजनी धरणाचा पाणीसाठा केवळ 0.91% एवढ्या टक्क्यावर आला आहे.तर उपयुक्त पाणीसाठा 0.49 टीएमसीवर आला आहे.त्यामुळे शेतीबरोबरच सार्वजनिक पाणीपुरवठा योजना अडचणीत येणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यतील रोज कमी अधिक प्रमाणात वाढणारे तापमान तसेच पाण्याचे मोठ्या प्रमाणावर होत असलेली बाष्पीभवन व सोलापूरसाठी तीन टप्यातील पाणी एकाच टप्प्यात सोडल्याने यामुळे गतवर्षी ओव्हरफ्लो झालेले उजनी धरण आता मात्र तळाकडे म्हणजेच पल्सवरून वजबाकीकडे वाटचाल सुरू केली असल्याची स्पष्ट झाले आहे.

उजनी धरणातील पाण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकाढून पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला असून आगामी काळात धरणातील पाण्यासठी येथील शेतकऱ्यांनी पाणी पाणी करण्याचे वेळ येणार असंल्याचे मत उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून व्यक्त करणे जात आहे.

उजनी जलाशयाचे पाणी झपाट्याने कमी होत असल्याने सखल भाग कोरडा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पिके जगण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे केबल, मोटारी,पाईप वाढवावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी जलाशयात खणलेल्या चाऱ्या आत्ता उघड्या होणे अशक्यप्राय वाटत होते.

परंतु अधिकाऱ्यांच्या मनमाणीपणामुळे चाऱ्यातर बाहेर पडतीलच परन्तु धरणात पाणीसाठा शिल्लक रहिलंब का नाही याची शास्वती नाही.त्यातच विजेच्या लपंडावाचा सामनाही शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

हेही वाचा – रेल्वेने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात पूर्वी प्रमाणे सुट द्यावी; ॲड विघ्ने यांचे रेल्वेमंत्र्यांना निवेदन

मकाई साखर कारखान्याची निवडणूक सभासदांच्या हक्कासाठी लढवणार; मकाई बचाव समितीचे निमंत्रक प्रा.रामदास झोळ यांचे प्रतिपादन

उजनी धरण मायनसच्या टप्प्यावर आले असताना धरणातून कोठेही पाणी सोडू नये व आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. उजनीतील पाणी मूळ धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावे अशी मागणी धरणग्रस्त शेतकऱ्यातून होत आहे.

litsbros

Comment here