करमाळा सोलापूर जिल्हा

केम सोसायटीच्या चेअरमन पदी माजी आ. जगताप गटाच्या शिंदे !

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

केम सोसायटीच्या चेअरमन पदी माजी आ. जगताप गटाच्या शिंदे !

केम(प्रतिनिधी); केम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या सौ सारिका भिमराव शिंदे यांची व व्हा चेअरमनपदी चंद्रकांत अभिमान दोंड यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्र सहाय्यक निबंधक उमेश बेंढारी होते . केम विकासे सोसायटीची निवडणूक नुकतीच अविरोध झाली होती.

या निवडीप्रसंगी नुतन संचालक दिलीप दोंड , विलास बिचितकर , आनंद शिंदे , दयानंद तळेकर , दत्तात्रय बिचीतकर , महादेव पारखे , अच्युत तळेकर , किरण तळेकर , सौ कौशल्या दोंड , नवनाथ कोळेकर , बाळासाहेब देवकर , सुमीत ओहोळ , मार्केट कमिटीचे संचालक सागर दोंड , संजय दोंड , भिमराव शिदे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

हेही वाचा – शेतकरी राजाची गोष्ट मोठ्या पडद्यावर झळकणार, टिझरला उदंड प्रतिसाद; ‘नवरदेव (Bsc Agri)’ चित्रपट २६ जानेवारीला होणार प्रदर्शित

स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा;गाव भेट दौऱ्यात ग्रामस्थांनी आमदार शिंदे यांच्याकडे केली होती मागणी

निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप , नगराध्यक्ष वैभव जगताप यांनी नूतन अध्यक्ष , उपाध्यक्ष , संचालक यांचे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. प्रास्तविक सोसायटीचे सचिव बबनराव मेहेर यांनी व आभार गटसचिव लक्ष्मण थोरात यांनी व्यक्त केले.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!