आरोग्यकरमाळा

आरोग्य सेनेच्या वतीने ‘ या’ दिवशी करमाळ्यात मोफत नेत्ररूग्ण व ऑपरेशन शिबीर 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आरोग्य सेनेच्या वतीने ‘ या’ दिवशी करमाळ्यात मोफत नेत्ररूग्ण व ऑपरेशन शिबीर 

 केम (प्रतिनिधी): संजय जाधव- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शिव आरोग्य सेनेच्या वतीने रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी करमाळा येथे सुतार गल्ली येथील डाॅ उमेशकुमार जाधव यांच्या रेवती हाॅस्पिटल येथे मोफत नेत्ररूग्ण तपासणी व मोफत ऑपरेशन शिबीर आयोजित केले असल्याची माहिती शिव आरोग्य सेना जिल्हा समन्वयक दिपक सुर्वे, जिल्हा अध्यक्ष डाॅ रामलिंगशेठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका द्वारे दिली आहे.

  

शिबीरा बाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगीतले कीी,  पुणे व मुंबई येथील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञांकडून या शिबीरात तपासणी केली जाणार असून या मध्ये मोफत डोळे तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,डोळ्याच्या तिरळेपणावर मोफत उपचार, डोळ्यात वाढलेले मांस काढणे इत्यादी उपचार मोफत करण्यात येणार आहे. 

सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर सुरु असणार असून जास्तीत जास्त नागरींकानी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, युवासेना विस्तारक उत्तम आयवळे व सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या यांच्या मार्गदर्शनातुन हे शिबीर आयोजित केले असुन हाॅस्पिटल चार्जेस, लेन्स, प्रवास, जेवण सर्व मोफत असणार असल्याने गोरगरीब रुग्णांना याचा फायदा होणार शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेल्या “ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण” हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवला असुन तालुक्यातील गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेना प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले.

litsbros

Comment here