आरोग्यकरमाळा

19 एप्रिल रोजी करमाळा येथे आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप: गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्याची लस उपलब्ध होणार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

19 एप्रिल रोजी करमाळा येथे आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप: गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्याची लस उपलब्ध होणार

केतूर ( प्रतिनिधी ) ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांच्या 83 व्या वाढदिवसाचे निमित्ताने शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व करमाळा तालुका पत्रकार वतीने मंगळवार 19 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.

रोग तपासणी हृदय तपासणी सर्व प्रकारच्या तपासण्या करून मोफत औषधे दिली जाणार आहेत.

कार्यक्रमात महिलांसाठी गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये याविषयी अकलूज येथील प्रसिद्ध डॉ. सौ. जन्यवाल मॅडम तपासणी करून लसीकरणाची नोंदणी करणार आहेत.

मंगळवारी सायंकाळी सात वाजता ह भ प ज्ञानेश्वर महाराज नरसिंह वाडी यांचे कीर्तन होणार आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान करमाळा तालुका पत्रकार संघाने केले आहे.

19 एप्रिल मंगळवारी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहर चिवटे यांचा सत्कार अमरनाथ टावर येथील सभा मंडपात करण्यात येणार आहे.

litsbros

Comment here