क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने अभिवादन
करमाळा (प्रतिनिधी): सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्रांतीची ज्योत पेटविणारे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती करमाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांनी सामाजिक न्याय, स्त्री शिक्षण, सामाजिक उत्थान आणि जातीव्यवस्था व अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांच्या प्रभावाने अनेक क्षेत्रात केलेले योगदान आणि भारतीय समाजाला त्रस्त करणार्या घटकांशी लढवून समाज जागृतीचे केलेले कार्य अजरामर आहे.
हा वास्तवादाचा विचार सन १८ व्या शतकात निर्भीडपणे मांडून सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, गुलामगिरीतुन समस्त वंचित समजाला बाहेर काढण्याचं काम करणारे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले थोर महामानव पुन्हा होणे नाही. क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान समजून राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते यांनी स्वतः रक्तदान करून सहभाग घेतला. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप, सुहास ओहोळ,भारिप नेते शहाजी ठोसर, कमलाईनगरी संपादक पत्रकार जयंत दळवी, भिमदल चे जिल्हा अध्यक्ष सुनील भोसले, भाजप तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिह ठाकुर, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन होगले, तालुका उपाध्यक्ष राजू ठोंबरे, विकास मेरगळ, संजय घोरपडे, संतोष कांबळे, मनोज कुलकर्णी, रघूवीर खटके, अमोल नाळे, नवनाथ मोहोळकर सर,शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आण्णा सुपनवर, विक्रम राऊत, माजी सरपंच अंकुश जाधव, हनुमंत भोंग सर, मयूर यादव,राऊत सर, विशाल बनकर सह क्रांतीसुर्य प्रतिष्ठान जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comment here