करमाळाशैक्षणिक

जि.प.प्रा केंद्र शाळा पोथरे येथील इ.7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

जि.प.प्रा केंद्र शाळा पोथरे येथील इ.7 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

करमाळा (प्रतिनिधी): पोथरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे 12 एप्रिल रोजी 2022-23 मधील इ.7 वी विद्यार्थी वर्गाच्या निरोप समारंभाचे आयोजन पोथरे येथे केले होते. वर्गशिक्षिका शगुफ्ता हुंडेकरी (शेख) मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला. यावेळी इ.7 वी च्या विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांसह  शिक्षकांचे गुलाबपुष्प व औक्षण करून अतिशय उत्कृष्टपणे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बप्पासाहेब शिंदे होते,

तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच हरिचंद्र झिंजाडे, विद्यमान सरपंच धनंजय झिंजाडे, ग्रामपंचायत सदस्य रघुवीर जाधव, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, पालक कृष्णा जाधव व राजेंद्र शिंदे सह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते . 

 कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु.समृद्धी राजेंद्र झिंजाडे हिने केले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन मान्यवरांचे स्वागत केले.

  यावेळी विद्यार्थ्यी व शिक्षकांमधील जून्या आठवणी सांगताना अश्रूपूर्ण नयनांनी प्रत्येक विद्यार्थी भावनिक होऊन शाळेच्या आठवणी व्यक्त करत होते. जिल्हा परिषद शाळेनेच आमच्या पंखाना खऱ्या अर्थाने बळकटी दिल्याचे सांगून आज मात्र आम्हाला या शाळेतील हा स्नेहाने भरलेला गोतावळा आणि हा परिसर सोडून पुढील शिक्षणासाठी दुसरीकडे जावे लागत आहे पण आम्ही भविष्यात देखील या शाळेने व शिक्षकांनी आमच्यावर केलेले संस्कार व ज्ञानाद्वारे दिलेली शिदोरी तमा बाळगत आदर्श विद्यार्थी,आदर्श नागरिक बनून शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवत राहू अशी ग्वाही विद्यार्थी मनोगतात प्रत्येक विद्यार्थी करत होते. त्यांचे ते मनोगत ऐकून अक्षःरशा उपस्थित मान्यवरांचे सुध्दा डोळे पाणावले. गुरुवर्यांनी व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर सदिच्छा व शुभेच्छछा दिल्या. अध्यक्षीय भाषणात बप्पा शिंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत तालुका स्तरावरुन ते जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल व त्यांनी अभ्यासात केलेल्या प्रगतीबद्दल त्यांनी भविष्यात देखील अशीच उंच उंच भरारी घेऊन चांगले आधिकारी बनवून गावाचे, आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. यावेळी उत्कृष्ट आदर्श वर्गशिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी मॅडम यांचा पालक सौ. माया जाधव आणि सौ.नूतन शिंदे यांनी यथोचित सत्कार केला.

आभार प्रदर्शन कु. शिवानी झिंजाडे व कु.अनुजा शिंदे यांनी मांडले. या कार्यक्रमाची सांगता वार्षिक स्नेहसंमेलनाच्या बक्षिसाच्या शिल्लक रकमेतून शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना चविष्ट आणि रुचकर भोजन देण्यात आले.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साहासह विद्यार्थी, शिक्षकांच्या डोळ्यातील आश्रू व हुंदके देऊन कार्यक्रम पार पडला.

litsbros

Comment here