जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रमजान पवित्र महिन्या निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन
केम (प्रतिनिधी) : संजय जाधव
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील अलिफ मस्जिद येथे इफतार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या वेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले संभाजी ब्रिगेड हि संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी अशी एकमेव संघटना आहे. सर्व समाज बांधवांना आपल्या बंधु भावा समान दर्जा देणे व एकत्रित करुन कार्य करते.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके,शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अतुल निर्मळ, राकेश पाटील, संभाजी ब्रिगेड ता अध्यक्ष सुहास पोळ, हेमंत शिंदे, पिंटु जाधव,अदिनाथ माने,सागर बनकर, रमीज शेख, रहेमान पठाण, रज्जाक पठाण,अमित संचेती,मुजाहीद फकीर, सुहास शिंदे, अभिजीत म्हमाणे, अविनाश घाडगे, सलीम शेख,आमिर फकीर, अरुण तावरे, इकबाल पठाण, हाजिमलंग शेख,समीर पटेल,शब्बीर शेख, आदि बहुसंख्यने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
Comment here