गोयेगावात कै. शेंडगे यांच्या वर्षश्राद्ध निमित्त किर्तनातून प्रबोधन व रक्तदान शिबिर संपन्न
केत्तूर (अभय माने) – कै . विष्णू शंकर शेंडगे गोयेगाव यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त किर्तनातून सागर बोराटे महाराज यांनी सांगितले की, मनी नाही भाव देवा मला पाव याविषयी सविस्तर माहिती सांगितली.
त्यांनी पुढे सांगितले की डोळे सांगून जाते व्यक्ती कशी आहे अश्रू सांगून जाते दुःख किती आहे वाचा सांगून जाते माणूस कसा आहे टेच सांगून जाते लक्ष कुठे आहे संस्कार सांगून जाते परिवार कसा आहे.
वेळ सांगून जाते आपलं कोणी पर्क कोण आहे त्यानुसार आजच्या प्रसंगी ही व्यक्ती कशी आहे हे इथल्या जमलेल्या जमावनुसार समजते याप्रसंगी त्यांच्या स्मरणार्थ लक्ष्मण महानवर सर यांनी गोयेगाव भजनी मंडळास एक विना दिला.
त्यानिमित्ताने कमलाभवानी रक्तपेढी यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.त्यामध्ये 22 जणांनी रक्तदान केले कै.विष्णु शेंडगे यांचा मृत्यू 22. 2.22 रोजी झाला होता त्यामुळे 22 जणांनी रक्तदान केले .
या कार्यक्रमासाठी ह भ प नाना पाडूळे महाराज ह भ प अजिनाथ खटमोडे महाराज ह भ प कायगुडे महाराज ह भ प राऊत महाराज व परिसरातील भजनी मंडळी व महेश येवले महाराज उपस्थित होते.
Comment here