करमाळा तालुक्यात थकबाकी वीजबिल वसुलीसाठी शेतीपंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू; शेतकरी हवालदिल
केत्तूर (अभय माने) : पिकविलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही, सतत हवामान बदलाचा परिणाम उत्पन्नावर होतो आहे. त्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच वीज वितरण कंपनीने थकबाकी वसुलीसाठी शेतीपंपाची वीज तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कोणतेही सरकार येऊ द्या ते शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसतेच हाच अनुभव शेतकरी सध्या घेत आहेत.
हिवाळ्याबरोबरच उन्हाळाही जोर धरू लागला आहे त्यामुळे पिकांना पाण्याची गरज असतानाच वीज कनेक्शन बंद केले जात आहेत त्यामुळे उभी पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
करमाळा तालुक्याच्या उजनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विजबिल थकबाकीच्या कारणामुळे शेतीपंपाचा वीजपुरवठा महावितरण कडून खंडित केलेला आहे.
करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत करावा तसेच वीजतोडणी त्वरित तात्काळ बंद करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अड.अजित विघ्ने यांनी केली आहे.
” करमाळा तालुक्यात शेतीपंपाची सुमारे 400 कोटीच्या आसपास थकबाकी आहे. वरिष्ठांच्या आदेशानीच वीज बिलाची वीज बिलाच्या वसुलीसाठी शेती पंपाचे कनेक्शन सोडविण्यात येत आहेत शेतकऱ्यांनी चालू भरल्यास तात्काळ कनेक्शन चालू करून देण्यात येतील त्यामुळे त्या त्या ट्रान्सफॉर्मवरील शेतकऱ्यांनी वीज बिल भरून सहकार्य करावे. महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत असल्यामुळे वीज वसुली करण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांनीही महावितरण कंपनी चे आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विज बिल भरण्याचे आवाहन महावितरण कडून करण्यात येत आहे.”
– सुमित जाधव, उपकार्यकारी अभियंता , करमाळा
Comment here