करमाळाजेऊरसोलापूर जिल्हा

कंदर येथे मयत झालेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला जेऊरच्या वीज वितरण कर्मचारी संघटनेने बीड जिल्ह्यातील घरी जाऊन दिला मदतीचा हात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कंदर येथे मयत झालेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला जेऊरच्या वीज वितरण कर्मचारी संघटनेने बीड जिल्ह्यातील घरी जाऊन दिला मदतीचा हात

करमाळा (प्रतिनिधी); दि.१२/०२/२०२३ रोजी येल्डा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील मयत वीज कंत्राटी कर्मचारी गोविंद खोडवे यांच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबाला जेऊर येथील वीज वितरण कर्मचारी संघटनेच्या वतीने 55 हजार रुपये रोख देण्यात आले.

मयत कर्मचारी गोविंद खोडवे यांच्या कुटुंबाची पाहणी केली असता अतिशय हालाखीची व अतिशय गरीब परिस्थिती आहे. सदर ठिकाणी उत्पन्नाचे काही साधन नाही, जमीन मोजकीच ती पण जिरायत, राहायला व्यवस्थित घर नाही, आई वडिल दररोज दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून उदनिर्वाह करतात.

आशी हालाखीची परिस्थिती असल्यामुळे मयत गोविंद हा कंदर ता. करमाळा येथे नोकरीसाठी आला होता. सदर ठिकाणी मयत गोविंद हा कंदर येथे वीज कंत्राटी कर्मचारी म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता.

लोकांच्या एका फोन वरती त्यांच्या कामासाठी धावत पळत जाणारा हा गोविंदाचा नियतीने घात केला आणि गोविंदाचा दुर्दैवी अपघात झाला.
त्यामुळे आम्ही गोविंदाच्या कुटुबियांना भेट देऊन, त्यांच्या कुटुंबियांना महावितरण कर्माचारी व अधिकारी यांच्या वतीने ५५०००/- आर्थिक मदत केली.

यावेळी उपस्थित महावितरणचे कर्तव्य दक्ष अधिकारी मा. श्री. अशोक काळे साहेब, महावितरण ठेकेदार मा. नितीन पाटील तसेच वरिष्ठ वायारमेन मा. श्री.उमेश फंड व रमेश पोळ आणि तेथील ग्रामस्थ उपस्थित होते.

जेऊर येथील वीज वितरण कर्मचारी संघटनेने केलेल्या या आगळ्यावेगळ्या आर्थिक मदतीमुळे मयत कंत्राटी कर्मचारी खोडवे यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

litsbros

Comment here