करमाळा क्राइम

करमाळा येथील प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलन; नागेश कांबळे यांचे निवेदन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्यावर विनयभंगाचा गून्हा दाखल करा अन्यथा आंदोलन; नागेश कांबळे यांचे निवेदन

करमाळा(प्रतिनिधी); येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ एल.बी.पाटील यांनी ग्रंथपाल महिलेचा विनयभंग व मानसिक छळ केला असून यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष यांच्याकडे त्यांनी रितसर तक्रार दाखल केलेली असून अजूनही कार्यवाही झालेली नसल्याने सदरील प्राचार्यांवर विनयभंगाचा गून्हा दाखल करावा अन्यथा आरपीआय च्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असे निवेदन रिपाई (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश दादा कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे दिलेले आहे.

  श्री कांबळे यांनी निवेदनात पुढे असे म्हटले आहे की सदरील महिलेस हे प्राचार्य जाणूनबुजून मानसिक त्रास देत असून अश्लील हावभाव, तसेच विनयभंग केलेला असून विद्येच्या या मंदिरात स्वतः प्राचार्यच जर असे दुष्कृत्य करीत असतील तर हे शैक्षणिक मंदिराचे अधःपतन असून हि गंभीर बाब आहे.असे असेल तर पालक आपल्या मुलींना या संस्थेत शिक्षणासाठी लावण्यापूर्वी विचार करतील.

असले शिक्षणक्षेत्राला कलंकित करणारे तसेच मागासवर्गीय उच्चशिक्षित महिलेवर होणारे अत्याचार हे कधीच सहन केले जाणार नाहीत. त्याविरुद्ध जनमताचा आवाज उठलाच पाहिजे, असे असताना संस्थेने चौकशीचा फार्स केला आहे. या संस्थेत 9/10 वर्षापूर्वी देखील अशीच तक्रार आली होती, तेव्हा मात्र असा फार्स केला नव्हता असे देखील निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनासोबत या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जोडली आहेत. निवेदनाच्या प्रती अधिक माहितीस्तव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस राज्यपाल मुंबई माननीय रामदास आठवले राष्ट्रीय नेते आर पी आय आदिना पाठवले आहे

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!