सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती मुस्लिम बांधवाच्या हस्ते संपन्न, करमाळयात घडले हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन
करमाळा(प्रतिनिधी); करमाळा येथे आज सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेशाची आरती करमाळा शहरातील मुस्लिम बांधवाच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी करमाळा शहरात हिंदू मुस्लिम ऐक्यतेचे आगळे वेगळे दर्शन घडले असुन यावेळी हाजी अल्ताफशेठ तांबोळी, फारुक जमादार हाजी फारुक बेग सुरज शेख जमीर सय्यद मुस्तकीन पठान जहांगीर बेग रमजान बेग जावेद पठाण मुन्ना शेख शायर बागवान आदी जण उपस्थित होते.
करमाळा शहरातील मुस्लिम बांधवाच्या वतीने गेली ३५ वर्षा पासुन श्री गणेश विसर्जन मिरवणूकीवर जामा मस्जिद वरुन फुलांची पुष्पवृष्टी करण्यात येते अश्या सर्व मुस्लिम बांधवाच्या हस्ते श्री ची आरती आज संपन्न झाली.
यावेळी सरकार मित्र मंडळाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवाचा सत्कार करण्यात आला यावेळी सरकार मित्र मंडळाचे विनय ननवरे विजय लावंड, सचिन घोलप सचिन गायकवाड़ अमोल यादव संतोष वारे अरूण जगताप अमर शिंगाडे आदी जण उपस्थित होते.
Comment here