करमाळा सांस्कृतिक सोलापूर जिल्हा

करमाळा तालुक्यात नागपंचमी उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा तालुक्यात नागपंचमी उत्साहात साजरी

करमाळा( प्रतिनिधी);
करमाळा शहरात व तालुक्यात नागपंचमी उत्साहात साजरी झाली. शहरात सकाळी नागप्रतिमेचे मानकरी व पुजारी रामचंद्र दळवी व भैय्या दळवी,जयंत दळवी, महेश दळवी, सागर दळवी यांच्या किल्ला विभाग निवासस्थानापासून सकाळी 8:30 वा. नागाच्या प्रतिमेची आरती करण्यात आली होती.नंतर रावगाव रोडवरील नागोबा मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली.

यावेळी विविध सामाजिक सांप्रदायातील नागरिक तसेच नागनाथ मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी दिवसभर करमाळा शहरात युवक वर्ग मोठ्या संख्येने पतंग उडविण्याचा आनंद घेत होता.

विविध प्रकारचे पतंग विविध प्रकारचे मांजा होता. युवकांनी वेग वेगळा ग्रुप केला होता. पतंग उडवत असताना काटाकाटी खेळताना एका ग्रुपचा पतंग काटून गेल्यावर दुसऱ्या ग्रुपचे युवक कटिरे काटी पतंग असे मोठ्याने ओरडा ओरडा करत आनंद उत्सव साजरा करत होते.
याप्रसंगी स्पीकर लावले होते.

विविध फिल्मी गाणे लावून पतंग उडवण्याचा आनंद घेत होते. तसेच रावगाव रोडवरील नागोबा मंदिरात दर्शनासाठी महिला, पुरुष, अबाल वृद्ध, बालगोपाळांनी दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

रांगेत दर्शन घेत होते. दर्शन घेतल्यानंतर यात्रेतील विविध खाद्यपदार्थ बालगोपाळांसाठी विविध पाळणे, खेळणी यासह इतर यात्रेतील महिला, पुरुष, वृद्ध, बालगोपाळांनी आनंद घेतला.

हेही वाचा – आमदार शिंदेंचा उजनीतील पाणी पळविण्याचा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही; कुणी केला हा आरोप ? क्लिक करून वाचा सविस्तर

भाजपचा पराभव करुन सत्तेत आला, आता त्यांच्या दावणीला जाऊन बसायची भूमिका घेता; शरद पवारांनी फटकारल

याप्रसंगी श्री नागनाथ मित्र मंडळ यात्रा उत्सव समितीचे जालिंदर जाधव वस्ताद यांच्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी प्रसादाचे आयोजन केले होते तसेच यात्रा पार पडावी म्हणून योग्य नियोजन त्यांनी केले होते. या मंदिर परिसरात काही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून करमाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी नागनाथ मित्र मंडळाचे अनिल गवळी, सचिन माने,विकी धनवे,गणेश झाकणे, अक्षय जाधव, शुभम साळुंखे आदी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

नागनाथ मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते गेले एक महिना झाले नागपंचमी उत्सव मोठया प्रमाणात साजरा करावा म्हणून यथोचित प्रयत्न करीत आहे सध्या तीन दिवस यात्रा होत आहे भविष्यात भक्तांसाठी यात्रा उत्सव वाढवण्याचे नियोजन आहे
– जालिंदर जाधव प्रमुख नागनाथ मित्र मंडळ, करमाळा

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!