मकाईचा रणसंग्राम; प्रा. रामदास झोळ यांच्या बैठकीला आ.संजय मामा शिंदेंच्या समर्थक नेत्याची उपस्थिती, अनेकांच्या भुवया उंचावल्या
करमाळा(प्रतिनिधी); मकाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मकाई बचाव आघाडी स्थापन करून मैदानात उतरलेले प्रा.रामदास झोळ यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आमदार संजय मामा शिंदे यांचे समर्थक उमरड गावचे ज्येष्ठ नेते वामन दादा बदे यांनी उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दत्तकला शिक्षण संस्था स्वामी चिंचोली भिगवण येथे झोळ यांच्या गटाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना प्रा झोळ म्हणाले की, अर्ज बाद केल्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो आहोत. निकाल नक्कीच आमच्या बाजूने लागेल, याची खात्री आहे. सध्या आमचे सात उमेदवार रिंगणात आहेतच, कोर्टाच्या निर्णयानंतर आम्ही सर्वजणच निवडणुकीत असू.
या बैठकीत शिंदे समर्थक बदे यांच्या सह मोहिते पाटील समर्थक आबासाहेब टापरे , स्वाभिमानीचे महेंद्र गोडसे, रवींद्र गोडगे, आनंद झोळ, लालासाहेब जगताप, राजेंद्र भोसले, गफुर शेख आदी जण उपस्थित होते.
Comment here