अक्कलकोटकरमाळापंढरपूरबार्शीमंगळवेढामाळशिरससांगोलासांस्कृतिकसोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्री-वेडिंग फोटो शूटिंगवर सोलापूर जिल्हा मराठा समाजाची बंदी; सोलापूरात मराठा वधू वर परिचय मेळ्यावत ठराव 

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

प्री-वेडिंग फोटो शूटिंगवर सोलापूर जिल्ह्यातील मराठा समाजाची बंदी; सोलापूरात मराठा वधू वर परिचय मेळ्यावत ठराव

सोलापूर-(प्रतिनिधी); मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित मराठा वधू वर मेळाव्यात करण्यात आला. या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी आणि शासनाला जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून दिले आहे. त्यामुळे समाज बांधवांनी या ठरावाची पायमल्ली न करता प्री वेडिंग शूटिंग ला पायबंद घालावा असा सूर देखील यावेळी मान्यवरांच्या भाषणातून निघाला.

 

      मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने रविवारी शिवस्मारक सभागृह वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे – पाटील,जय हिंद शुगरचे चेअरमन बबुवान माने – देशमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे ,

बैठकीस उपस्थित समाज बांधव

परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक दत्तामामा मुळे जिल्हा उपाध्यक्ष जी. के. देशमुख, सदाशिव पवार , शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे , जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे , मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश काटोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. 

     प्रारंभी छञपती शिवाजी महाराज , जिजाऊ माँ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर जिजाऊ वंदना घेण्यात आली प्रस्ताविक भाषणात जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी वधू वर मेळाव्या घेण्यामागची भूमिका विशद केली. परिवहन सभापती राजन जाधव यांनी आपल्या भाषणात समाजासाठी अशा वधू वर मेळाव्याची गरज आहे.

मात्र विवाह सोहळा जमवण्याच्या माध्यमातून होणाऱ्या दलालीला आळा बसला पाहिजे त्यासाठी मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी देखील मार्गदर्शन केले. समाजातील विवाह परिस्थिती भयानक आहे. आई-वडिलांनी व्यापक अपेक्षा न करता कर्तृत्ववान आणि सुसंस्कार मुलगा पाहून विवाह करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली .आई-वडिलांनी आपल्या मुलाचा विवाह करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता सुसंस्कृत कर्तृत्ववान आणि संस्कारी मुलाची निवड करावी. साधेपणाने विवाह पार पाडावेत .विवाह सोहळ्याप्रसंगी केली जाणारी प्री वेडिंग शूटिंगवर पाय बंद घालावा . तसा ठराव देखील या वधू वर मेळाव्यात केला गेला सर्व समाज बांधवांनी याला एकमताने पाठिंबा दिला.

 हा वधू-वर मेळावा यशस्वी करण्यासाठी आर. पी. पाटील, अंबादास सपकाळे, राम माने, रमेश जाधव, नवनाथ कदम, अभिजंली जाधव, शोभाताई गुटे, नितीन जाधव, कल्याण गव्हाणे , डॉ. संजिवनी पवार, सचिन चव्हाण, नितीन भोसले , सिद्धाराम वाघ , दिपक शेळके ,संतोष जाधव, सचिन शिंदे, सुशिल गवळी, प्रवीण थोरात , गोवर्धन गुंड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक यांनी तर आभार दिनकर देशमुख यांनी मांडले 

चौकट 

वधू-वरांचा परिचय अभिजंली जाधव डाॕ. संजीवनी पवार , मनाली जाधव ,अनिशा जाधव , वैभवी पवार यांनी करून दिला

चौकट 

या वधू वर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला शहर जिल्हा परिसरातील तब्बल 400 ते 500 वधू वर त्यांचे पालक हजर होते. यावेळी प्राथमिक स्वरूपात काही वधू तर काही वरांनी आपला परिचय करून दिला यामध्ये डॉक्टर इंजिनीयर अशा उच्चशिक्षित वधू-वरांचा समावेश या वधू वर मेळाव्यात होता

चौकट 

परिस्थिती नसताना देखील कर्ज काढून प्री वेडिंग शूटिंग वर लाख रुपये खर्च केले जातात आणि वैयक्तिक खाजगी फोटो सार्वजनिक करण्याची प्रथा रुढ झाली आहे . याला कुठेतरी आळा बसला पाहिजे प्री वेडिंग शूटिंग वर येणार खर्च गोरगरिबाच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत म्हणून देण्याचा सूर देखील या मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी यावेळी काढला. भविष्यात एक गाव एक विवाह ही संकल्पना मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुढे आणली जाणार आहे.

litsbros

Comment here