मकाई साखर कारखान्याची निवडणूक सभासदांच्या हक्कासाठी लढवणार; मकाई बचाव समितीचे निमंत्रक प्रा.रामदास झोळ यांचे प्रतिपादन
माजी आमदार जगताप यांचा मकाई बचाव समितीला पाठिंबा!
केतूर ( प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सभासदांच्या घामाच्या पैशातून उभा राहिलेला मकाई कारखाना दिवाळखोरी कडे चालला असून या कारखान्याला वाचवण्यासाठी बचाव समितीच्या माध्यमातून सर्व गट तट पक्षातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मकाईची निवडणूक लढवणार असल्याचे माहिती मकाई बचाव समितीचे निमंत्रक प्राध्यापक रामदास झोळ यांनी दिली
करमाळा विश्राम गृहावर झालेल्या या बैठकीसाठी आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे आदिनाथचे संचालक डॉक्टर वसंत पुंडे मकाई कारखान्याचे माजी संचालक सुभाष शिंदे आदिनाथकारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे, आदिनाथ बचाव समितीचे संचालक प्राचार्य जयप्रकाश बिले आधी जण उपस्थित होते.
या मकाई बचाव समितीला किरण कवडे गौरव झांजुर्णे, सुजित तात्या बागल, शहाजीराव देशमुख सर आदींनी पाठिंबा दिला आहे .
बोलताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की मकाई बचाव समितीला माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पाठिंबा दिला असून मकाईच्या सभासदांच्या हितासाठी व तालुक्याचे हितासाठी जयवंतराव जगताप या निवडणुकीत होणार असल्याची माहिती दिली.
याबाबत बोलताना प्राध्यापक रामदास झोळ म्हणाले की मकाई सहकारी साखर कारखाना निष्क्रिय कारभारामुळे रसातळाला चालला आहे .
नोव्हेंबर 2022 पासून आलेल्या उसाचे पहिले पेमेंटसुद्धा कारखान्याने दिलेले नाही पाच ते सात वर्षाचा कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे.
मकाई सहकारी साखर कारखाना चांगल्या लोकांच्या ताब्यात दिला तर निश्चितच त्यात बदल घडू शकतो
मकाईच्या सभासदांच्या पुढे आम्ही सक्षम असा पर्याय देणार असून जागृत मतदार मकाई बचाव समितीला निवडून देतील असा आम्हाला विश्वास आहे.
तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पुढाऱ्याला रस आहे मात्र मकाईच्या निवडणुकीसाठी प्रत्येक जण राजकीय स्वार्थासाठी आपली भूमिका जाहीर करत नाही
आज सभासदांना सत्ताधाऱ्यांना पायउतार करण्यासाठी नवीन पर्याय हवा आहे तो नवीन पर्याय आम्ही या ठिकाणी देणार असून
निवडणुकीत बागल विरोधक सर्वांना एकत्रित आणून त्यासोबत शेतकरी संघटना सोबत घेणार आहोत.
——-
सोमवारी मकाई कारखान्याची अंतिम सभासदाची यादी जाहीर होणार असून येत्या दहा ते बारा दिवसात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येईल असा अंदाज आहे प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या मकाई बचाव समितीच्या माध्यमातून मकाई कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली असून मकाई बचाव समिती निवडणूक लढवणार असल्यामुळे येणाऱ्या काळात राजकारणाची दिशा काय ठरेल हे काळच ठरवेल
उसाचे पेमेंट द्या मगच उमेदवारी अर्ज भरा!!
प्रमोद बदे
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रमोद बदे म्हणाले की मकाई सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे जवळपास 30 कोटी रुपये अडकून ठेवले आहेत पहिला हप्ता सुद्धा शेतकऱ्यांना दिलेला नाही कर्मचाऱ्यांचे पाच वर्षाचे पगार नाहीत या सर्व रकमा दिग्विजय बागल यांनी शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना द्याव्यात मगच दिग्विजय बागल यांनी मग काही साखर कारखान्यासाठी उमेदवारी अर्ज भरावा अन्यथा निवडणूक लढवू नये.
Comment here