करमाळाधार्मिक

करमाळा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

केतूर ( प्रतिनिधी) करमाळा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने सर्व राष्ट्रपुरुषांना अभिवादन करून महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. खोलेश्वर मंदिर किल्ला येथे महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

 लिंगायत समाजाचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, संजय आप्पा शीलवंत, दीपक पाटणी, शिवकुमार चिवटे जयराज चिवटे संजय महाजन, अभय महाजन, बाळासाहेब महाजन, सचिन माऊली, विशाल गुळवे, सुनील विभुते, जयराज चिवटे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, हापुरे गुरुजी नागेश गुरव संकेत पुराणिक गणेश मंदापुरी सचिन बरीदे किरण कोरपे गणेश कोरपे आदी लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

करमाळा शहरातून मोटार सायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त मानवंदना देण्यात आली

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करून महात्मा बसेश्वर जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात समानतेचा धडा देऊन स्त्रियांना मान सन्मान देण्याची भूमिका घेतली. ब्राह्मण व्यवस्थेवर बहिष्कार टाकून लिंगायत धर्माची स्थापना केली. ईस्ट लिंगाची स्थापना करून भगवान शंकराला आपल्या आत्म्यातच सामर्थ्य दिले.

आपला आत्मा हाच देव असून आपल्या आत्म्याची पूजा करा अशा प्रकारचे विचार मांडले

अनेक व्यक्तींनी यावेळी आपले मत विचार व्यक्त केले.

litsbros

Comment here