करमाळा सोलापूर जिल्हा

करमाळा, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, वेणेगाव हा जुना पालखी मार्ग करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, वेणेगाव हा जुना पालखी मार्ग करण्याची मागणी

केत्तूर( अभय माने) आषाढी वारी साठी पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांसाठी करमाळा, गुळसडी, वरकटणे, निंभोरे, वडशिवणे, सातोली, दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव फाटा (सोलापूर पुणे महामार्गापर्यंत). हा परंपरागत दोनशे वर्षाहून जुना असलेला पालखी मार्ग व्हावा अशी मागणी अमरजित सांळुखे यांनी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटिल यांच्याकडे केली होती.

आमदार रणजीत सिंह मोहिते-पाटील यांनी करमाळा ते सातोली, वेणेगाव पर्यंतच्या पालखी मार्ग संदर्भात व निधी उपलब्ध होणे संदर्भात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात असे म्हटले कि, आषाढी वारीसाठी, मराठवाडा, खान्देश, विदर्भातून करमाळा, गुळसडी, वरकटणे, निंभोरे, वडशिवणे, सातोली दहिवली, कन्हेरगाव, वेणेगाव (सोलापूर पुणे हायवे पर्यंत) या जुन्या पंढरपूर रस्ता मार्गे सुमारे १५० ते २०० पालखी दिंडयासह २ लाख वारकरी पंढरपूरला जातात.

या पालखी मार्गावर निंभोरे हे गाव आहे या गावात संत शांतामाई यांची समाधी आहे. या संत शांतामाई अंध असूनही संपूर्ण ज्ञानेश्वरी, हरिपाठ पाठ होते. त्या संत म्हणून मराठवाडा, खानदेश, विदर्भात प्रसिध्द होत्या. पंढरपूरला जाणारे सर्व वारकरी प्रथम समाधीचे दर्शन घेतात व पुढे प्रस्थान करतात.

सुमारे २०० वर्षाहून अधिक जुनी परंपरा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील दींड्या या मार्गावरून पंढरपूर येथे जाण्याची आहे. या मार्गावरील सर्व गावांमध्ये ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक दिंडीचे व पालखीचे उत्साहात स्वागत करण्याबरोबरच वारकऱ्यांची राहण्याची व जेवणाची उत्तम अशी व्यवस्था केली जाते.

या सर्व सोयी वारकऱ्यांना मिळाल्या तरी रस्त्यांची समस्या मात्र वारकऱ्यांच्या पाचवीला पुजलेली आहे. वडशिवने – सातोली ते दहिवली या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्यावरील खडी उघडी पडली असून मोठमोठाले खड्डे पडलेले असल्याने त्यामध्ये पाणी साठत आहे.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे नव्या पिढीला प्रेरणादायी भाषेत बाबासाहेब सांगणारे पुस्तक; खा. वर्षा गायकवाड मुंबईत खा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते 13 व्या आवृत्तीचे प्रकाशन

कोरोनात आई बाबा गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा मदतीचा हात; सलग चौथ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

अत्यंत खराब झालेल्या या रस्त्यावरून चालताना वारकऱ्यांच्या पायाला वेदना होतात. पाय मुरगाळतात, वारकऱ्यांचे गुडघे दुखतात तरी देखील वारकरी याही परिस्थित पांडुरंगाचे नाम घेत आपले ध्येय साध्य करतात. वारकरी बंधु मात्र गावकऱ्यांना दरवर्षी विनंती करतात की, पुढच्या वर्षापर्यंत तरी हा रस्ता नव्याने करावा.

या रस्त्याच्या कामासाठी लवकरात लवकर मंजूरी मिळावी आणि रस्त्याचे काम सुरू व्हावे अशी मागणी अमरजित सांळुखे यांनी केली आहे.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!