आरोग्यकरमाळा

करमाळा शहरातील डॉ एस.टी.शहा यांचे दुःखद निधन; वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा शहरातील डॉ एस.टी.शहा यांचे दुःखद निधन; वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

करमाळा(प्रतिनिधी); करमाळा शहरातील सुप्रसिद्ध व नामांकित डॉक्टर एस टी शहा ( वय ८७ ) यांचे पहाटे अल्प आजाराने दुःखद निधन झाले . सोलापूर जिल्ह्यात सरकारी डॉक्टरी सेवेच्या निमित्ताने आलेले डॉ एस टी शाह तत्कालीन नेते कै .नामदेवराव जगताप यांचे सूचनेनुसार व सहकार्याने करमाळा येथे आले व वैद्यकीय सेवा सुरु केली.

आपल्या वैद्यकीय सेवेतून ते करमाळा करांच्या गळ्यातील ताईत बनले होते . त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे .

डॉ एस टी शाह यांचे दुःखद निधनामुळे कुटुंबातील कर्ता माणुस गमावल्याची भावना : माजी आमदार जयवंतराव जगताप 

डॉ एस .टी .शाह यांच्या निधनाचे वृत्त समजले व अतीव दुःख झाले परंतु ईश्वरी इच्छेपुढे इलाज नाही . शाह साहेबांच्या जाण्यामुळे व्यक्तिश : मी माझ्या कुटुंबातील कर्त्या माणसाला गमाविले आहे . परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो , मी शाह कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.

litsbros

Comment here