करमाळा

माजी आमदार नारायण पाटील यांचे उपस्थितीतील केतुरच्या जलजीवन उद्घाटन कार्यक्रमाला सवितादेवी राजेभोसले गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुष्टी?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माजी आमदार नारायण पाटील यांचे उपस्थितीतील केतुरच्या जलजीवन उद्घाटन कार्यक्रमाला सवितादेवी राजेभोसले गैरहजर; नाराजीच्या चर्चांना पुष्टी?

करमाळा (प्रतिनिधी); केतुर नंबर एक येथे माजी आमदार नारायण पाटील यांचे उपस्थितीत जल जीवन योजनेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर जिल्हा परिषद सदस्या व मोहिते पाटील गटाच्या कट्टर समर्थक सवितादेवी राजेभोसले यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर केमचे माजी सरपंच अजित दादा तळेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून नावे होती मात्र या दोन्ही नेते मंडळींनी या कार्यक्रमाला अनुपस्थिती दाखवल्यामुळे भोसले व तळेकर माजी आमदार नारायण पाटील यांच्यावर नाराज असल्याचा वृत्ताला पुष्टी मिळाली आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजेभोसले यांना पॅनल उभा करून निवडणूक लढवायची होती मात्र या निवडणुकीत पाहिजे तसे सहकार्य किंवा पाठिंबा माजी आमदार नारायण पाटील यांनी न दिल्यामुळे सवितादेवी राजेभोसले नारायण पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

उपस्थित सर्व मान्यवर..

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवून माजी आमदार नारायण पाटील यांनी बागल गटाला सॉफ्ट कॉर्नर दिल्याची चर्चा असून तसे त्यांच्या कृतीतून दिसून आले आहे
ही भूमिका सवितादेवी राजेभोसले व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना पटलेली नाही.

सवितादेवी राजेभोसले विधानसभेचे उमेदवार होऊ शकतात मोहितेपाटील गटाचा त्यांना पाठिंबा आहे
सवितादेवी राजेभोसले तालुकास्तरीय राजकारणात महिला नेत्या म्हणून येऊ नये अशी भूमिका तालुक्यातील प्रमुख विद्यमान नेते मंडळाची आहे

2014 च्या विधानसभा निवडणुकीत नारायण पाटील यांना आमदार करण्यात सवितादेवी राजेभोसले यांचा सिंहाचा वाटा होता मात्र नंतरच्या राजकीय काळात त्यांना कोणत्याही ठिकाणी मोठी संधी नारायण पाटील तर्फे मिळाली नाही
जिंती ग्रामपंचायत मध्ये सविता देवी राजे भोसले यांच्या मुलाला पराभव स्वीकारावा लागला

सविता देवी राजे भोसले यांचा राजकीय पवित्रा बदलणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

मात्र मकाईची निवडणूक होऊन पंधरा दिवस उलटले तरी अद्याप सवितादेवी राजेभोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही

मकाई कारखान्याच्या निवडणुकीनंतर आपल्या सोशल अकाउंट वर
” राजकारणात कुणी कायमचा शत्रू व कायमचा मित्र नसतो ” असा स्टेटस ठेवून सविता देवी राजेभोसले यांनी नेमका इशारा कोणाला दिला होता याचा उलगड आता होऊ लागला आहे

litsbros

About the author

karmalamadhanews24

Add Comment

Click here to post a comment

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!