करमाळाराजकारण

मकाई व कमलाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत बिले त्वरित द्यावीत, स्वाभिमानीचे तहसीलदारांना निवेदन; निवडणूक झाली! आता बिलं मिळतील का? शेतकऱ्यांत चर्चा..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मकाई व कमलाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांची थकीत बिले त्वरित द्यावीत, स्वाभिमानीचे तहसीलदारांना निवेदन; निवडणूक झाली! आता बिलं मिळतील का? शेतकऱ्यांत चर्चा..

जेऊर (प्रतिनिधी); मकाई सहकारी व कमलाई लिमिटेड. साखर कारखान्यांचे थकीत एफ आर पी व्याजासहित शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविभाऊ गोडगे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

 करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना हे शेतकऱ्यांच्या जीवावर उभा राहिलेले साखर कारखानेअसून. या कारखान्यांचा 2022/23 गाळप हंगाम पूर्ण झालेला आहे या कारखान्याकडे शेतकऱ्यांची एफ आर पी व वाहन मालक यांचे कमी जास्त 40/45 कोटी पर्यंत देणे बाकी आहे तरी शेतकऱ्यांची एफआरपी ही 14 दिवसाच्या आत देणे बंधनकारक असून. 

जर त्या कारखान्याने 14 दिवसाच्या आत शेतकऱ्यांची एफ आर पी दिली नाही तर पुढील दिवसाची 14 टक्के प्रमाणे व्याज हे शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे परंतु हंगाम संपून तीन ते चार महिने उलटले तरीही शेतकऱ्यांची बिले घेण्यात आलेली नाहीत .तरी त्या कायद्याअंतर्गत मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई प्रा.लि. साखर कारखाना.यांनी शेतकऱ्यांची देणे लवकरात लवकर व्याजासहित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत.

 अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे व शेतकऱ्यांची देणे व्याजासहित न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावरील व कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे असे निवेदनात शेवटी गोडगे यांनी म्हटले आहे.

litsbros

Comment here