करमाळयाच्या राजकारणाला नवे वळण! एकमेकांचे कट्टर विरोधक तिघे एकत्र, मोहिते पाटलांची आ.शिंदेंना चेकमेट करण्यासाठी बाजार समितीच्या पार्श्वभूमीवर नवी खेळी.. वाचा सविस्तर
करमाळा(प्रतिनिधी) ज्या निवडणुकीमुळे करमाळा तालुक्यातील राजकारणाला शत्रुत्वचे वळण लागले होते ती, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती ची निवडणूक आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या विशेष पुढाकाराने यंदा बिनविरोध होणार असल्याचे दिसून येत आहे. आज अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये याबाबत काही महत्त्वाचे निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सदर बैठकीमध्ये करमाळा तालुक्यातील महत्त्वाचे राजकीय गट समजले जाणारे म्हणजे माजी आमदार नारायणराव पाटील, माजी आमदार जयंतराव जगताप तसेच दिग्विजय बागल अशा प्रमुख नेत्यांची बैठक आज अकलूज येथे पार पडली या बैठकीमध्ये माजी आमदार जयंतराव जगताप यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सूत्रे देण्याचे एकमताने ठरले. असे बोलले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची अर्ज उमेदवारी माघार घेण्याची तारीख येत्या सोमवारी अखेरची असून या निवडणुकीमध्ये तालुक्यातील जगताप पाटील बागल गटाच्या प्रमुख उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज भरले होते.
सध्या खासदार असणारे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागील काही काळात आमदार संजय मामा शिंदे यांच्याशी जवळीक वाढल्याची चर्चा होत होती. तसेच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आपली ताकत आ शिंदे यांच्या पाठीशी लावल्याने आ शिंदेचे पारडे जड झाले होते. पण जगताप याना आपलेसे करून व ही युती घडवून आणून आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी एकाच वेळी खासदार निंबाळकर व आमदार शिंदे यांना धक्का दिला आहे, असे ही सध्या जनतेतून बोलले जात आहे.
सदरची निवडणुकी होणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुका सहित जिल्हाभर होती अखेर या चर्चेवर पडदा पडला असून आज शुक्रवार रोजी अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच भाजपाचे युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील या दोघा बंधूनी करमाळा तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे जगताप पाटील व बागल यांना एकत्रित करून सदरची निवडणूक ही बिनविरोध व्हावी या दृष्टिकोनातून बैठक ठेवली होती.
अखेर या बैठकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध करण्याचे ठरले यामध्ये बागल गटाला दोन तसेच पाटील गटाला दोन अशा पद्धतीने ग्रामपंचायत मतदार संघात जागा देण्याचे ठरले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीमध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटातील प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले होते शेवटी तिन्ही गटातील प्रमुख नेत्यांना एकत्रित करण्याचे महत्त्वाचे काम आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केल्यामुळे सदरची निवडणुक आता बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Add Comment