करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथे भिमजयंती तयारी निमित्त डॉ.आंबेडकर संघर्ष समितीची नियोजन बैठक संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे भिमजयंती तयारी निमित्त डॉ.आंबेडकर संघर्ष समितीची नियोजन बैठक संपन्न

करमाळा(प्रतिनिधी);
करमाळा येथे करमाळा येथे डॉ. आंबेडकर संघर्ष समिती संयुक्त जयंतीची नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी या नियोजन बैठकीसाठी विविध जाती-धर्मातील युवकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला होता.

या बैठकीमध्ये विविध विषय चर्चेसाठी घेण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. 11, 12, 13 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम घेण्याचे सदरील बैठकीमध्ये एकमताने ठराव मंजुर करण्यात आला.

तर या बैठकीमध्ये संबंधीत जयंती उत्सवासाठी कार्यकारणी सुध्दा जाहिर करण्यात आली. सदरील कार्यकारणी पुढीलप्रमाणे – जयकुमार कांबळे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष- फिरोज शेख, खजिनदार- सनी कांबळे, युसुफ शेख, मिरवणुक प्रमुख- समीर शेख, मंगेश ओहोळ इ. पदाधिकाऱ्यांची डॉ. आंबेडकर संघर्ष समिती संयुक्त जयंतीच्या कार्यकारणीवर निवड करण्यात आली.


हेही वाचा – जागतिक महिला दिन विशेष! टेम्पो चालवून हाकते ती संसाराचा गाडा; अंजनगावच्या सुनेची अभिमानास्पद कहाणी

करमाळयासह इतर सहा तालुक्यांमध्ये तब्बल बारा मोटरसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरांना करमाळा पोलिसांनी घातल्या बेड्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या नियोजन बैठकीसाठी तेजस कांबळे गणेश झाकणे मंगेश ओहोळ सोहिल दारूवाले आकाश धनवे शंभू आहेर फिरोज शेख सागर पवार गणेश टकले शैलेश कांबळे स्वप्नील धाकतोडे बुधभूषण घोडके राजू पवार गणेश पवार समीर शेख स्वप्नील कांबळे रवी कांबळे सिद्धांत कांबळे समाधान शिरसागर प्रशांत आलाट चिंटू कांबळे युसुफ शेख निलेश कांबळे तोसिफ मनेरी राजू पठाण सोहेल पठाण तोफिक पठाण सादिक कुरेशी जावेद बागवान साहिल मनेरी मुन्ना पठाण अजिंक्य कांबळे शाकिब शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here