करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथील कु. मितवा सत्यपाल श्रीवास्तव हीचा सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्रातील पुरस्काराने सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथील कु. मितवा सत्यपाल श्रीवास्तव हीचा सांस्कृतिक साहित्य कला क्षेत्रातील पुरस्काराने सन्मान

करमाळा (प्रतिनिधी); करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर सत्यपाल श्रीवास्तव तसेच प्रख्यात साहित्यिका अंजली श्रीवास्तव यांची कन्या मितवा श्रीवास्तव हिचा सांस्कृतिक कला साहित्य क्षेत्रातील पुरस्काराने सासवड जिल्हा पुणे येथे नुकताच सन्मान करण्यात आला.

जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद १४वे राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन सासवड येथे संपन्न झाले.
सदर साहित्य संमेलनात साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

करमाळ्यात भरतनाट्यम् नृत्याचा प्रारंभ मितवा श्रीवास्तव अग्रवाल यांनी गुरुवर्य मा.मयुरी ताई जोशी पुणे यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून केला.
आनंदाची बाब म्हणजे महाराष्ट्र व इतर राज्यातून तर विद्यार्थीनी या कलेचा लाभ तर घेत आहेत.

हेही वाचा – भंगारा पेक्षा ही कांद्याला कमी भाव; हमीभाव व अनुदान जाहीर करा अन्यथा रास्ता रोको करू; रासपचे करमाळा तहसीलदारांना निवेदन

सहा महिने उलटून गेले तरी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही; तत्काळ नुकसान भरपाई द्या अन्यथा तीव्र आंदोलन

पण देशाबाहेरील अनेक विद्यार्थीनी देखील भरतनाट्यम् या कलेचा लाभ घेत आहेत. सातासमुद्रापार करमाळा सारख्या ग्रामीण भागाचं नाव भरतनाट्यम् च्या माध्यमातून दूर पोहचवण्याचं काम मितवा श्रीवास्तव यांनी केले आहे.
मितवा यांचा एक मराठी काव्य संग्रह प्रकाशित झाला असून एक हिंदी कविता संग्रह व गझल संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

सदरचा पुरस्कार ह़ंबीरराव मोहिते यांचे १४ वेवंशज राजेंद्र बाजी मोहिते, इतिहास संशोधक व संमेलनाचे अध्यक्ष डॉ.बालाजी जाधव व मा.विजयकुमार कोलते व दशरथ यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर गौरव मितवा श्रीवास्तव व मयंक अग्रवाल यांनी स्विकारला. साहित्यिक क्षेत्रातील मितवा श्रीवास्तव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचे सर्व स्तरातून विशेषता अभिनंदन होत आहे.

litsbros

Comment here